Home /News /maharashtra /

बदली करा नाहीतर आत्मदहन; इशारा देऊन पोलीस हवालदार गायब झाल्यानं उडाली तारांबळ

बदली करा नाहीतर आत्मदहन; इशारा देऊन पोलीस हवालदार गायब झाल्यानं उडाली तारांबळ

माझी संध्याकाळपर्यंत बदली झाली नाही, तर मी अज्ञात ठिकाणी जाऊन आत्मदहन करीन, असा इशारा देऊन पोलीस हवालदार गायब झाल्यानं जालना जिल्हा पोलीस ( jalna Police news) प्रशासनात एकच खळबळ उडाली.

जालना, 02 सप्टेंबर : माझी संध्याकाळपर्यंत बदली झाली नाही, तर मी अज्ञात ठिकाणी जाऊन आत्मदहन करीन, असा इशारा देऊन पोलीस हवालदार गायब झाल्यानं जालना जिल्हा पोलीस ( jalna Police news) प्रशासनात एकच खळबळ उडाली. जिल्हा पोलीस प्रशासनामध्ये नुकत्याच झालेल्या पोलिसांच्या बदल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात तक्रारी करण्यात येत आहेत. त्यातूनच आज घडलेल्या या प्रकारावरून प्रशासनाची चांगली तारांबळ उडाली. जालन्यात बदल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात राजकारण आणि पक्षपात झाल्याचा आरोप अन्याय झालेल्या पोलिसांकडून करण्यात येत आहे. घनसावंगी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस हवालदार (police Constable) गोविंद कुलकर्णी यांनी पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांची भेट घेऊन काही दिवसांपूर्वी बदलीचा विनंती अर्ज केला होता. मात्र, आतापर्यंत दोन ते तीन बदल्यांच्या याद्या निघूनही गोविंद कुलकर्णी यांची बदली झाली नसल्याने ते नाराज होते. त्यामुळे गोविंद कुलकर्णी यांनी आज एका व्हाट्सअप ग्रुपवर स्वतःचा व्हिडिओ बनवला. त्यामध्ये माझी संध्याकाळपर्यंत बदली झाली नाही, तर मी अज्ञात ठिकाणी जाऊन आत्मदहन करीन, असा इशारा दिला. हे वाचा - OMG : दे धक्का.. रेल्वेला..! टॉवर वॅगनला लोकांनी ढकलत आणलं दुसऱ्या ट्रॅकवर या इशाऱ्यामुळे जिल्हा पोलीस दलात एकच खळबळ उडाली असून कुलकर्णी यांच्या शोधासाठी पोलिसांची धावपळ सुरू झाली होती. दरम्यान सायंकाळी त्यांचा शोध घेण्यात पोलीस यंत्रणेला यश आल्याचे सांगण्यात येत आहे.
Published by:News18 Desk
First published:

Tags: Maharashtra police, Police

पुढील बातम्या