भायखळ्याच्या पोलीस कॉन्स्टेबलचा नाशकात अल्पवयीन मुलीवर बलात्कार

मुंबई पोलिसात कार्यरत असणाऱ्या कॉन्स्टेबलनं 15 वर्षीय गतीमंद मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये घडली.

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Apr 5, 2017 10:10 AM IST

भायखळ्याच्या पोलीस कॉन्स्टेबलचा नाशकात अल्पवयीन मुलीवर बलात्कार

 

05 एप्रिल : मुंबई पोलिसात कार्यरत असणाऱ्या कॉन्स्टेबलनं 15 वर्षीय गतीमंद मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये घडली. गोरख शेखरे असं या आरोपी पोलिसाचं नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे.

मुंबईतल्या भायखळा पोलीस ठाण्यात कॉन्स्टेबल असलेला गोरख हा नाशिकमधल्या दिंडोरी तालुक्यातील मोहाडी गावी सुट्टीवर आला होता. सोमवारी रात्री घराबाहेर भांडी घासत असताना गोरखनं पीडितेला उचलून नेलं आणि तिच्यावर बलात्कार केला.

पीडित मुलीच्या आरडाओरडीनं जमा झालेल्या गावकऱ्यांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं.  आरोपी गोरखवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला 7 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

दरम्यान, यापूर्वीही मुंबईत दारु पिऊन गैरवर्तन केल्यामुळं गोरखवर पोलीस खात्यातर्फे कारवाई करण्यात आली होती, अशी माहिती समजते आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 5, 2017 10:10 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...