चिंताजनक! दोन कोरोना योद्धांचा बळी, मुंबईत पोलिस तर मालेगावात डॉक्टराचा मृत्यू

चिंताजनक! दोन कोरोना योद्धांचा बळी, मुंबईत पोलिस तर मालेगावात डॉक्टराचा मृत्यू

देशासह महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. मृतांच्या आकड्यातही सातत्याने वाढ होत आहे. त्यात आता कोरोनानं त्याच्याविरुद्ध लढा देणाऱ्या योद्धांनाच टार्गेट केलं आहे.

  • Share this:

मुंबई, 25 एप्रिल: देशासह महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. मृतांच्या आकड्यातही सातत्याने वाढ होत आहे. त्यात आता कोरोनानं त्याच्याविरुद्ध लढा देणाऱ्या योद्धांनाच टार्गेट केलं आहे. मुंबईत कोरोनामुळे पोलिस कॉन्स्टेबलचा तर नाशिक जिल्ह्यातील मालेगावात डॉक्टरचा मृत्यू झाला आहे. मुंबईत पोलिस दलातील कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची ही पहिलीच घटना आहे.

मृत पोलिस कॉन्स्टेबल 57 वर्षांचा असून वाकोला पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत होते. त्यांचा कोरोना टेस्टचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. मृत कॉन्स्टेबलच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले आहेत. दरम्यान, मुंबईत वाकोलासह परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आहे.

हेही वाचा...यामुळे इतिहासात पहिल्यांदाच 'अक्षय्य तृतीया आणि सोनं खरेदी' हे समीकरण तुटणार

दुसरीकडे, नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या मालेगावात शनिवारी एका 71 वर्षीय डॉक्टरचा कोरोनानं बळी घेतला आहे. संबंधित डॉक्टर कोरोनाबाधित असल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते, अशी माहिती मिळाली आहे. या घटनेनंतर मालेगावमधील कोरोनाबाधित मृतांचा आकडा 12 वर पोहोचला आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, देशात कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या वाढून 24,506 झाली आहे. यात आतापर्यंत 5063 रूग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. देशात गेल्या 24 तासांत 57 मृत्यू झाले आहेत. या व्यतिरिक्त 1429 नवीन प्रकरणे नोंदली गेली आहेत. देशात 775 जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात कोरोनाचे 6817 रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 840 आहेत जे पूर्णपणे बरे झाले आहेत. त्याचवेळी, 301 लोक मरण पावले

हेही वाचा.. मुंबईत धोका कायम! प्रतिबंधित क्षेत्रांतही मोठी वाढ, 1000 चा आकडा पार

आहेत. दरम्यान, राज्यात आतापर्यंत 96 पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. 96 पोलिसांत 15 अधिकाऱ्यांचा आणि 81 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

संपादन- संदीप पारोळेकर

First published: April 25, 2020, 7:59 PM IST

ताज्या बातम्या