मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

कोरोना संकटात रुग्णालयाकडून लूट आणि उपचारात हलगर्जीपणा भोवला; रुग्णालयाविरोधात गुन्हा दाखल

कोरोना संकटात रुग्णालयाकडून लूट आणि उपचारात हलगर्जीपणा भोवला; रुग्णालयाविरोधात गुन्हा दाखल

शहरातील दत्त चौक परिसरात डॉ. महेश शाह यांचे हॉस्पिटल आहे. त्याठिकाणी कोरोना रुग्णांवर उपचार केले जातात.

शहरातील दत्त चौक परिसरात डॉ. महेश शाह यांचे हॉस्पिटल आहे. त्याठिकाणी कोरोना रुग्णांवर उपचार केले जातात.

शहरातील दत्त चौक परिसरात डॉ. महेश शाह यांचे हॉस्पिटल आहे. त्याठिकाणी कोरोना रुग्णांवर उपचार केले जातात.

  • Published by:  Meenal Gangurde

भास्कर मेहरे, प्रतिनिधी

यवतमाळ, 14 मे: यवतमाळ शहरातील (Yavatmal) डॉ. शाह (Dr. Shah) यांच्या हलगर्जीपणामुळे रुग्णांचा मृत्यू झाल्याचा आरोप करत रुग्णांच्या नातेवाईकांनी पोलिसांत तक्रार (Police complaint) दाखल केली. त्यावरून डॉ. शाह यांच्या रुग्णालया विरुद्ध अवधुतवाडी पोलीस ठाण्यात (Avdhutwadi Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला. डॉ शाह विरुद्ध कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.

शहरातील दत्त चौक परिसरात डॉ. महेश शाह यांचे हॉस्पिटल आहे. त्याठिकाणी कोरोना रुग्णांवर उपचार केले जातात. मात्र अलीकडे या डॉ विरुद्ध अनेक तक्रारी येत आहेत. राधाकृष्ण वाधवानी यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता तेव्हा ते उपचारासाठी डॉ शाह यांच्या रुग्णालयात दाखल झाले. त्यावेळी त्यांच्यावर 7 दिवस उपचार करण्यात आले आणि त्यासाठी रुग्णालयाकडून तब्बल 1 लाख 34 हजार 600 रुपयांच्या बिलाची आकारणी करण्यात आली.

वाचा: राज्यातील कोरोनाची दुसरी लाट ओसरतेय! आजही बाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या अधिक

या बिलाबाबत वाधवानी यांनी प्रशासनाकडे तक्रार केली. त्यानंतर डॉ शाह यांनीच उलट वाढवानी यांनी वकिलामार्फत नोटिस देऊन आपण बिल न देताच निघून गेले अस म्हटलं. प्रशासन या प्रकरणात व्यवस्थित लक्ष घालत नाही असा आरोप वाधवानी यांनी केला आहे.

यवतमाळ शहरातील अधिव्याख्याता अरुण गजभिये यांना सुद्धा कोरोनाची लागण झाली त्यामुळे त्यांना शाह हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. सुरुवातीला त्यांची प्रकृती उत्तम होती. त्यांचा hrct स्कोअर फक्त 5 होता मात्र डॉक्टरांच्या दूर्लक्ष पणामुळे दोन दिवसांत स्कोअर वाढला आणि अखेर त्यांचा मृत्यू झाला. दुर्दैवी गोष्ट म्हणजे अरुण गजभिये यांच्या नातेवाईकांना तिसऱ्याच मृतदेह देण्यात आला. हा सर्व प्रकार स्मशान भूमीमध्ये उघडकीस आला. त्यामुळे संतापलेल्या नातेवाईकांनी डॉ. शाह यांच्या रुग्णालयाच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

First published:

Tags: Coronavirus, Crime, Yavatmal