तुळजाभवानी देवस्थानचे महंतांवर गुन्हा, वाढदिवसाचे निमित्त साधत गोळा केली गर्दी

तुळजाभवानी देवस्थानचे महंतांवर गुन्हा, वाढदिवसाचे निमित्त साधत गोळा केली गर्दी

आता सर्वसामान्य नागरिक वेळोवेळी नियम मोडतात, अशी ओरड होत असते, आता लोकांना तत्वज्ञान सांगणाऱ्या महंतानीच कायदा मोडला असल्याने तुळजापूर परिसरात एकच चर्चा रंगली आहे.

  • Share this:

उस्मानाबाद, 12 एप्रिल: नेहमी कुठल्या न कुठल्या कारणाने चर्चेत राहणारे तुळजाभवानी देवस्थानचे मुख्य पुजारी व महंत तुकोजीबुवा वाकोजीबुवा यांच्यासह 6 जणांवर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लॉकडाऊनमध्ये वाढदिवसाचे निमित्त साधत केक कापण्यासाठी गर्दी गोळा केल्याचा तुकोजीबुवा वाकोजीबुवा यांच्यावर आरोप आहे. एवढेच नाही तर केक कापतानाचे व्हिडीओ बनवून ते त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले. तुकोजीबुवा वाकोजीबुवा यांच्यासह 6 जणांवर कलम 188, 269 व कोविड कायदा 11 अन्वये प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा...सोशल मीडियावर फिरणाऱ्या धारावीतल्या 'त्या' VIDEO मागील हे आहे सत्य

दरम्यान, राज्यात कोरोनाचं संकट दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊन असून तो 30 एप्रिलपर्यंत वाढवण्यात आला आहे. तरी देखील काही लोकांना याचं गांभीर्ण नाही. जमावबंदी असताना गर्दी गोळा करुन वाढदिवस साजरा करत आहेत. असंच एक प्रकरण समोर आलं आहे. ते म्हणजे तुळजाभवानी देवस्थानच्या महंतांनी जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करत त्यांचा वाढदिवस साजरा केला. एवढे नाही तर त्यांनी त्याचा व्हिडिओ देखील बनवला. आता या कारनाम्यामुळे ते अडचणीत सापडले आहेत.

हेही वाचा..6 महिन्याच्या बाळाने जिंकला कोरोनाचा लढा; VIDEO पाहून डोळ्यात येतील अश्रू

तुकोजीबुवा वाकोजीबुवा यांच्याविरोधात तुळजापूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता सर्वसामान्य नागरिक वेळोवेळी नियम मोडतात, अशी ओरड होत असते, आता लोकांना तत्वज्ञान सांगणाऱ्या महंतानीच कायदा मोडला असल्याने तुळजापूर परिसरात एकच चर्चा रंगली आहे.

संपादन- संदीप पारोळेकर

First published: April 12, 2020, 4:09 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading