महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांविरुद्ध पोलिसांत गुन्हा, तहसिलदारालाच केली मारहाण

महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांविरुद्ध पोलिसांत गुन्हा, तहसिलदारालाच केली मारहाण

वाळूच्या गाड्यांवर केलेला दंड कमी करा, अशी मागणी चंद्रहार पाटील हे मागील काही दिवसांपासून तहसिलदारांकडे करत होते. मात्र,

  • Share this:

सांगली, 3 मे: डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी तहसिलदाराला बेदम मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी विटा पोलिसांत चंद्रहार पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण?

चंद्रहार पाटील यांच्या अवैध वाळूची वाहतूक करणाऱ्या गाड्या जप्त करत विटा येथील तहसीलदार ऋषिकेत शेळके यांनी साडेसात लाखांचा दंड ठोठावला होता. या वाळूच्या गाड्यांवर केलेला दंड कमी करा, अशी मागणी चंद्रहार पाटील हे मागील काही दिवसांपासून तहसिलदारांकडे करत होते. मात्र, तहसीलदार यांनी सर्व दंड भरावाच लागेल, अशी सूचना दिली होती. याचा राग मनात धरून चंद्रहार पाटील आणि त्यांच्या एका साथीदाराने तहसिल कार्यालयाच्या आवारातच तहसीलदार ऋषिकेत शेळके यांना बेदम मारहाण केली. यात तहसीलदारांनी गंभीर दुखापत झाली आहे. याप्रकरणी खुद्द तहसीलदार ऋषिकेत शेळके यांनी विटा पोलीस स्टेशनमध्ये चंद्रहार पाटील यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. सरकारी कामात अडथळा, आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा भंग, शासकीय अधिकाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा.. मद्यपींना खूशखबर! मुंबई-पुण्यासारख्या रेड झोनमध्ये सुरु होतील वाईन शॉप

उपसा, वाहतुकीस बंदी, मग वाळू येते कुठून असा प्रश्न उपस्थित होत आहे. जिल्ह्यात वाळू, मुरुम, दगडाची वाहतूक बेकायदेशीर आहे. परंतू रात्रीच्या वेळी वाळू वाहतूक कशी सुरु असते, ही वाळू नेमकी कुठून येते, वाळू वाहतुकीस कोणाचा आशीर्वाद आहे, असा सवाल नागरिकांतून उपस्थित केला जात आहे. सध्या वाळूला सोन्याचा दर मिळत आहे. त्यामुळे बाहेरील जिल्ह्यातून सांगलीत वाळू आणली जात आहे. रात्री आणि पहाटे वाळूचे ट्रक आणि डंपर येतात.

हेही वाचा.. कोरोना: डॉक्टरांनी सोडली जगण्याची आशा, 81 वर्षांच्या वडिलांना मुलाने वाचवलं

First published: May 3, 2020, 6:11 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading