मुंबई, 29 नोव्हेंबर : पोलीस भरतीवरून राज्यात काहीना काही घटना घडत आहेत यामुळे राज्यातील राजकारणात आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान पोलीस भरतीसाठी फॉर्म भरण्याचे काम सुरू झाले आहे असली ऑनलाईन अर्ज भरताना उमेदवारांना तांत्रिक अडचणीचा सामना करावा लागतो आहे. फॉर्म भरण्यासाठी काही दिवसच उरल्याने विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वेबसाईट व्यवस्थित चालत नसल्याने नेट कॅफे आणि ऑनलाईन सेंटरवर विद्यार्थी तळ ठोकून आहेत. तसेच साईट व्यवस्थित करा अन्यथा तारीख वाढवून द्या अशी मागणी विद्यार्थी करत आहेत. याचबरोबर आता या मागणीसाठी माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सरकारला आवाहन केलं आहे.
पोलीस भरतीचा फॉर्म भरण्यासाठी चकरा मारूनही फॉर्म भरला जात नसल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे. काही विद्यार्थी तर रात्री फॉर्म भरला जाईल म्हणून इंटरनेट कॅफेमध्ये मुक्कामास येत आहेत.
पोलिस भरतीसाठी राज्यातील लाखो तरुण तयारी करत आहेत.ही भरती त्यांच्यासाठी आशेचा किरण आहे.असे असताना तांत्रिक अडचणीमुळे या तरुणांना फॉर्म भरताना अडचणी येत आहेत.त्यांचे फॉर्म सबमिट होत नाहीयेत अथवा फॉर्म भरतीची प्रक्रिया पुर्ण होत नाही आहे.आज फॉर्म भरण्याचा शेवटचा दिवस असल्याचे समजले
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) November 29, 2022
हे ही वाचा : 'बुलडाण्यातून निवडणूक लढवून दाखवा', शिंदे गटाच्या खासदाराचे थेट उद्धव ठाकरेंना चॅलेंज
जितेंद्र आव्हाड म्हणाले की, पोलिस भरतीसाठी राज्यातील लाखो तरुण तयारी करत आहेत. ही भरती त्यांच्यासाठी आशेचा किरण आहे. असे असताना तांत्रिक अडचणीमुळे या तरुणांना फॉर्म भरताना अडचणी येत आहेत. त्यांचे फॉर्म सबमिट होत नाहीयेत अथवा फॉर्म भरतीची प्रक्रिया पुर्ण होत नाही आहे. आज फॉर्म भरण्याचा शेवटचा दिवस असल्याचे समजले.
राज्य सरकारला विनंती आहे की त्यांनी, या तरुणांच्या भविष्याचा विचार करून, फॉर्म भरण्याची मुदत वाढवून द्यावी. यासोबतच सदर फॉर्म भरताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी देखील दूर कराव्यात. या तरुणांच्या भविष्यासाठी राज्य सरकार 15 दिवस तरी नक्की मुदतवाढ देईल अशी खात्री आहे. असे आव्हाड म्हणाले.
शासनाने पोलीस भरती प्रक्रियेसाठी ज्या वेबसाईटवर उमेदवारांना अर्ज भरायचे आहेत ती साईटच व्यवस्थित चालत नसल्याने विद्यार्थ्यांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागतोय. विद्यार्थ्यांनी मोठी मेहनत घेऊन भरतीची तयारी केली केली. आता याच भरतीची ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी साईट चालत नसल्याने विद्यार्थ्यांना इंटरनेट कॅफेवरच रात्र जागून काढावी लागत आहे.
हे ही वाचा : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर आज सुनावणी नाही, कोर्टातून आली मोठी माहिती समोर
साईट व्यवस्थित चालत नसल्याने अनेक विद्यार्थ्यांचे अद्याप रजिस्ट्रेशन ही झाले नाहीत तर काही विद्यार्थ्यांची पेमेंट प्रक्रिया देखील अडकल्याने विद्यार्थ्यांची चिंता वाढली आहे..त्यामुळे हे विद्यार्थी आता पोलीस भरतीची ऑनलाईन अर्ज भरण्याची तारीख वाढवून देण्याची मागणी सरकारकडे केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Jitendra awhad, Maharashtra police, Mumbai police, Police