मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /आर्थिक अडचणीमुळे शेती विकली अन् पैसेही हरवले; हवालदिल शेतकऱ्यासाठी पोलीस ठरले देवदूत

आर्थिक अडचणीमुळे शेती विकली अन् पैसेही हरवले; हवालदिल शेतकऱ्यासाठी पोलीस ठरले देवदूत

Dhule News: एका शेतकऱ्याने आर्थिक अडचणीमुळे घरची शेती विकली होती. पण शेती विकून आलेला सर्व पैसा बस स्थानकावर हरवल्यानं (Farmer lost money on bus stand) हा शेतकरी हवालदिल झाला होता.

Dhule News: एका शेतकऱ्याने आर्थिक अडचणीमुळे घरची शेती विकली होती. पण शेती विकून आलेला सर्व पैसा बस स्थानकावर हरवल्यानं (Farmer lost money on bus stand) हा शेतकरी हवालदिल झाला होता.

Dhule News: एका शेतकऱ्याने आर्थिक अडचणीमुळे घरची शेती विकली होती. पण शेती विकून आलेला सर्व पैसा बस स्थानकावर हरवल्यानं (Farmer lost money on bus stand) हा शेतकरी हवालदिल झाला होता.

धुळे, 30 मे: धुळ्यातील आर्थिक संकटात सापडलेल्या एका शेतकऱ्यासाठी पोलीस देवदूत ठरले आहे. येथील एका शेतकऱ्याने आर्थिक अडचणीमुळे घरची शेती विकली होती. पण शेती विकून आलेला सर्व पैसा बस स्थानकावर हरवल्यानं (Farmer lost money on bus stand) हा शेतकरी हवालदिल झाला होता. एकीकडे शेती गेली आणि पैसाही हरवला यामुळे दुहेरी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यासाठी पोलीस देवदूत ठरले आहेत. पैस हरवल्याने डोक्याला हात लावून बसलेल्या या गरीब शेतकऱ्याची चिंता खाकी वर्दीने दूर केली आहे. त्यांनी शेतकऱ्याची हरवलेली दीड लाख रुपयांची रक्कम परत मिळवून (Police recovered farmers money) दिली आहे.

भीकन महादू पाटील असं संबंधित शेतकऱ्याचं नाव असून तो पारोळा तालुक्यातील मंगरुळ येथील रहिवासी आहेत. कोरोना लॉकडाऊनमुळे हाताला रोजगार नसल्याने भीकन हे आर्थिक संकटात सापडले होते. या संकटातून आपली सुटका करून घेण्यासाठी त्याने आपली घरची शेती विकली. शेती विक्रीचा व्यवहार करून घरी येत असताना भीकन यांची पैशाची पिशवी धुळ्यातील शहादा फलाटावर हरवली.

दरम्यान शुक्रवारी पोलीस या बसस्थानकावर गस्त घालत असताना, त्यांना एक बेवारस पिशवी आढळली. पोलिसांनी या पिशवीची पाहाणी केली असता, त्यांना या पिशवीत 1 लाख 47 हजार रुपयांची रक्कम आणि दोन आधारकार्ड असा ऐवज सापडला. या आधारकार्डच्या माध्यमातून पोलिसांनी भिकन महादू पाटील आणि त्यांची बहिण कल्पना गणेश पाटील यांना पोलीस ठाण्यात बोलावून घेतलं.

हे ही वाचा-कोरोना काळातही पोलिसांचा खिसा गरमच; पुण्यात 5 महिन्यांत 21 लाचखोरीच्या घटना उघड

त्यांची चौकशी केली असता, संबंधित बेवारस रक्कम शेतीच्या विक्रीतून आल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी पोलिसांची पूर्ण खात्री पटल्यानंतर पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी भीकन पाटील यांना ही रक्कम परत केली आहे. शेती विकून आलेली रक्कम परत मिळाल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या भीकन यांना आनंदाचा पारावर उरला नाही.

First published:

Tags: Dhule, Farmer, Police