मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

VIDEO : मुसळधार पावसात धबधब्यावर तोबा गर्दी; अतिउत्साही पर्यटकांना पोलिसांनी धू धू धुतलं!

VIDEO : मुसळधार पावसात धबधब्यावर तोबा गर्दी; अतिउत्साही पर्यटकांना पोलिसांनी धू धू धुतलं!

राऊतवाडी धबधब्याच्या धोकादायक कड्यावर चढलेल्या अतिउत्साही पर्यटकांना पोलिसांनी चांगलाच चोप दिला आहे.

राऊतवाडी धबधब्याच्या धोकादायक कड्यावर चढलेल्या अतिउत्साही पर्यटकांना पोलिसांनी चांगलाच चोप दिला आहे.

राऊतवाडी धबधब्याच्या धोकादायक कड्यावर चढलेल्या अतिउत्साही पर्यटकांना पोलिसांनी चांगलाच चोप दिला आहे.

  • Published by:  News18 Desk

रत्नागिरी, 17 जुलै : राज्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक धबधबे, धरणांवर पर्यटकांची गर्दी पाहायला मिळत आहे. यातच आता राधानगरी तालुक्यातील राऊतवाडी धबधबा येथे काही अतिउत्साही पर्यटक धोकादायक कड्यावर चढायचा प्रयत्न करत होते. त्यामुळे या अतिउत्साही पर्यटकांना पोलिसांनी चांगलाच चोप दिला आहे.

पर्यटकांना पोलिसांचा चोप -

राऊतवाडी धबधब्याच्या धोकादायक कड्यावर चढलेल्या अतिउत्साही पर्यटकांना पोलिसांनी चांगलाच चोप दिला आहे. राधानगरी तालुक्यातील हा प्रसिद्ध असा धबधबा आहे. मोठ्या संख्येने या ठिकाणी पर्यटक येतात. यापैकी काही जण धबधब्याच्या कड्यावर चढण्याचा प्रयत्न करत होते. निसरट झालेल्या या कड्यावर चढताना जीवावर बेतू शकते, त्यामुळे पोलिसांनी या पर्यटकांना चांगलाच चोप दिला.

पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर निसर्गाचा आनंद घेण्यासाठी थांबाल तर ...

पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर थांबून निसर्गाच्या सौंदर्याचा आनंद घेणार असाल तर जरा थांबा. कारण द्रुतगती मार्गावर थांबणं तुम्हाला महागात पडू शकते. पुणे जिल्ह्यासह मावळात मुसळधार पाऊस सुरू आहे. द्रुतगती मार्गाच्या दोन्ही बाजूनी छोटे, मोठे नैसर्गिक धबधबे वाहत आहेत. ते आपल्या मोबाईलमध्ये कैद करण्यासाठी किंवा सोबत फोटो काढण्यासाठी पर्यटक थांबतात.

आता हे थांबणं त्यांना चांगलंच महागात पडू शकते. कारण असे आढळून आल्यास त्यांच्यावर MSRDC दंडात्मक कारवाई करणार आहे. अनेकदा असे थांबणे अपघाताला निमंत्रण असू शकते म्हणून दंडात्मक कारवाईचा बडगा MSRDC उगारणार आहे. तशी पथकेही तैनात करण्यात आली आहेत.

हेही वाचा - पावसाचे पाणी थेट पिता येते का? तुमच्याही मनात आहेत हे चुकीचे गैरसमज? आत्ताच दूर करा

अद्यापही संकट टळलं नाही ...

राज्यात झालेल्या या मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं. इतकंच नव्हे तर अनेकांना आपले प्राणही गमवावे लागले. राज्यातील पावसाची परिस्थिती कशी राहणार, याबाबत हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे. पुढील 4, 5 दिवस महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढू शकतो. तसेच येत्या ३ दिवसांत काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे, असे हवामान खात्याने म्हटले आहे. त्यामुळे पावसाचे संकट टळलेले नाही.

First published:

Tags: Rain fall, Ratnagiri