मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

एका पानासाठी पोलिसांनी टपरीचालकाच्या मित्राला केली मारहाण, उस्मानाबादेतील घटना

एका पानासाठी पोलिसांनी टपरीचालकाच्या मित्राला केली मारहाण, उस्मानाबादेतील घटना

आनंद नगर पोलिसांनी फरीद शेख या टपरी चालकाच्या मित्राला मारहाण केल्यानंतरचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

आनंद नगर पोलिसांनी फरीद शेख या टपरी चालकाच्या मित्राला मारहाण केल्यानंतरचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

आनंद नगर पोलिसांनी फरीद शेख या टपरी चालकाच्या मित्राला मारहाण केल्यानंतरचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

उस्मानाबाद, 22 ऑगस्ट : पुण्यात (pune) पोलीस अधिकारी असलेल्या महिलेनं फुकट बिर्याणी (Free biryani) मागण्याचा प्रकार घडला होता. या घटनेमुळे सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली होती. पण, आता उस्मानाबादेत (osmanabad) टपरी चालकाने  पान दिले नाही म्हणून पोलिसांनी (police) टपरी चालकाच्या मित्राला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,  उस्मानाबाद शहरातील आनंद नगर पोलिसांनी फरीद शेख या टपरी चालकाच्या मित्राला मारहाण केल्यानंतरचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

महिलेनं भर रस्त्यात उगारलं चप्पल, केली तरुणाची धुलाई, पाहा Viral Video

शहरातील फरीद शेख एका टपरीवर उभा होता. आनंद नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश चव्हाण व त्यांचा चालक मुक्रम पठाण त्या ठिकाणी आले.  त्यांनी टपरी चालकास पान सुपारीची मागणी केली. यावरून त्यांच्यात बाचाबाची झाली. हे प्रकरण मिटविण्यासाठी आलेल्या फरीद शेख याला पोलिसांनी मारहाण केली आणि आनंद नगर पोलीस ठाण्यात घेऊन गेले, असं या व्हिडिओमधून दिसून येत आहे.

पोलिसांच्या मारहाणीमध्ये फरीद शेखच्या हाताला दुखापत झाली आहे. तसंच, पोलीस ज्यावेळी पानटपरीवर आले होते. ते गणवेशात नव्हते, असा आरोपही शेख याने केली.

तर, जखमी फरीद शेख याच्यावर सध्या उस्मानाबाद शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून जबाब नोंदविण्याचे काम सुरू आहे. या जबाबानंतर या प्रकरणी योग्य तो गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.  या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.

शासकीय आयुर्वेद महाविद्यालय उस्मानाबाद इथे प्रोफेसर पदासाठी भरती; लगेच करा अर्ज

काही दिवसांपूर्वी पुणे पोलिसांच्या मध्यवर्ती शहराच्या (Pune DCP audio clip viral) भागातल्या प्रमुख आयपीएस अधिकारी असलेल्या प्रियंका नारनवरे यांनी चक्क कर्मचाऱ्याला एस.पी. बिर्याणी मधून फुकट बिर्याणी आणण्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आणि पुणे पोलिसांमध्ये एकच खळबळ उडाली होती. एसपी बिर्याणीच्या साजुक तुपातल्या बिर्याणीसह नल्ली निहरी प्रॉन्स फ्राय अशा वेगवेगळ्या मेनूची चर्चा करणारी ही ऑडिओ क्लिप पुणे पोलिसांसाठी मोठी डोकेदुखी ठरली होती.

First published:

Tags: Osmanabad