वाजपेयींच्या शोकप्रस्तावाला विरोध करणाऱ्या एमआयएम नगरसेवकाला अटक

वाजपेयींच्या शोकप्रस्तावाला विरोध करणाऱ्या एमआयएम नगरसेवकाला अटक

औरंगाबादचे एमआयएमचे नगरसेवक सय्यद मतीनला अटक करण्यात आली आहे.

  • Share this:

औरंगाबाद, 18 ऑगस्ट : औरंगाबादचे एमआयएमचे नगरसेवक सय्यद मतीनला अटक करण्यात आली आहे. धार्मिक भावणा दुखावणे, जातीय तेढ निर्माण करणे आणि दंगा भडकवणे या आरोपाखाली त्यांना अटक करण्यात आलीये. शुक्रवारी वाजपेयी यांच्या श्रद्धांजली प्रस्तावाला मतीनने विरोध केला होता. त्यानंतर भाजपच्या नगरसेवकांनी मतीनला चपलेनं चांगलाच चोप दिला होता. त्यामुळं भाजप नगरसेवक प्रमोद राठोड, उपमहापौर विजय औताडे, राज वानखेडे यांच्याविरोधातही मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

औरंगाबादमध्येही अटलजींना श्रद्धांजली देण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता मात्र या प्रस्तावाला विरोध केल्याने एमआयएमच्या नगरसेवकाला मारहाण करण्यात होती. विरोध केल्याचा राग आल्याने सर्वपक्षीय नगरसेवकांनी सभागृहातच त्यांची धुलाई केली होती. त्यामुळे धार्मिक भावना दुखावणे, जातीय तेढ निर्माण करणे आणि दंगा भडकवण्याच्या आरोपाखाली सय्यद मतीनला अटक करण्यात आली आहे.

समांतर जलवाहिनी प्रकल्पाच्या प्रस्तावावर निर्णय घेण्यासाठी शुक्रवारी सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे निधन झाल्यामुळे त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा विषय महापौरांनी घेतला. वाजपेयी यांच्या जीवनावर आधारित चित्रफीत सभागृह दाखविण्यात आली.

मंडपाला हात लावला तर अधिकाऱ्यांचे हात छाटू, अविनाश जाधवांची ठाणे मनपाला धमकी

यानंतर एमआयएमचे नगरसेवक सय्यद मतीन यांनी श्रद्धांजली अर्पण करण्याच्या ठरावाचा निषेध केला. त्यामुळे भाजपचे सदस्य संतप्त झाले. प्रमोद राठोड, राज वानखेडे, माधुरी अदवंत, रामेश्वर भादवे यांनी मतीन यांच्यावर हल्ला चढवला. त्यांना अक्षरश: खाली पाडून लाथा- बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. माधुरी अदंवत यांनी तर मतीन यांना चपलेने मारले. या प्रकरणी एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी मतीन यांच्या वागण्याबद्दल नाराजी व्यक्त केली. पक्षाची अशी कोणतीही भूमिका नव्हती. मतीन यांची ती व्यक्तिगत भूमिका होती. मतीन यांनी असे का केले याबद्दल जाब विचारण्यात आला असून पक्षाचे नेते असाउद्दीन ओवेसी यांना याबद्दल माहिती देण्यात आली आहे.

दरम्यान, या प्रकरणावरून औरंगाबादेत काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. भाजपचे सर्व कार्यकर्ते सिटी चौक पोलीस ठाण्यात गोळा झाले होते. मतीन यांच्या विरोधात तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये भाजपचे नेते जमले. अखेर पोलिसांनी मतीन यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. मात्र काही वेळा आधीच भाजपच्या एक कार्यकार्त्याची गाडी मतीन याच्या समर्थकांनी फोडली होती आणि चालकाला मारहाणही केली होती. या सगळ्या गदरोळामुळे औरंगाबाद मधील काही भागात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला होता.

VIDEO: वाजपेयींच्या श्रद्धांजली सभेला विरोध करणाऱ्या एमआयएमच्या नगरसेवकाला चपलेने मारले

First published: August 18, 2018, 5:52 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading