Home /News /maharashtra /

पश्चिम बंगालची विडी भिवंडीत तयार करत होता भामटा, पोलिसांनी 7 लाखांच्या साठ्यासह केली अटक

पश्चिम बंगालची विडी भिवंडीत तयार करत होता भामटा, पोलिसांनी 7 लाखांच्या साठ्यासह केली अटक

पश्चिम बंगालमधील प्रसिद्ध रूपा विडीला भिवंडी शहरात आणि ग्रामीण परिसरात मोठ्या प्रमाणात मागणी आहे.

भिवंडी, 28 जानेवारी : पश्चिम बंगालमधील प्रसिद्ध रूपा विडीच्या बनावट विडीचा साठा असलेल्या एका गोदामावर शांतीनगर पोलिसांनी छापे'टाकून बनावट  विडी  विक्रीचा पर्दापाश केला आहे.  या प्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून बनावट विडी साठवणूक करणाऱ्या आरोपीला अक करून गोदामातील  ७ लाख ९२ हजार रुपयांचा रूपा विडीचा बनावट साठा जप्त केला आहे. मोहम्मद रियाजउद्दीन निजामउद्दीन शेख (५२) असं बनावट विडीची साठवणूक  केल्याप्रकरणी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार,  पश्चिम बंगालमधील प्रसिद्ध रूपा विडीला भिवंडी शहरात आणि ग्रामीण परिसरात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्यामुळे आरोपीने गेल्या काही वर्षापसून भिवंडीतील गैबीनगर येथील एका मशिदीच्या लगत आलेल्या इमारतीच्या तळमजल्यावरील गाळ्यात बनावट रूपा विडीचे गोदामात साठवणूक करून विक्रीचा व्यवसाय  थाटला होता. त्यातच रूपा विडी कंपनीचे व्यवस्थापक रामजीत गुप्ता ( ४७,रा.उल्हासनगर ) यांना आठ दिवसापूर्वी गुप्त बातमीदारामार्फत खबर मिळाली होती की, गैबीनगरमधील एका गाळ्यात बनावट रूपा विडी गोदामात साठवून ठेवलीअसल्याचे समजले होते. याची खातरजमा केल्यानंतर रूपा विडी कंपनीचे व्यवस्थापक गुप्ता यांनी शांतीनगर पोलिसांच्या मदतीने काल रात्री साडे दहा वाजता या बनावट विडीच्या गोदामावर छापा टाकला. त्यावेळी आरोपी मोहम्मद रियाजउद्दीन निजामउद्दीन शेख हा बनावट रूपा विडीची विक्री करण्याच्या तयारीत असतानाच त्याला गोदामातून ताब्यात घेतले.आणि या ठिकाणी सफेद गोण्यामधील भरललेल्या बनावट रूपा विडीचा ७ लाख ९२ हजार रुपयांचा रूपा विडीच्या  बनावट साठा केलेल्या ६६ सफेद गोण्या जप्त केल्या आहेत. दरम्यान, रूपा विडी कंपनीचे व्यवस्थापक गुप्ता यांच्या तक्रारीवरून शांतीनगर पोलीस ठाण्यात  आरोपी  मोहम्मद रियाजउद्दीन याच्या विरोधात कॉपीराईटचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. आरोपी बनावट विडी तयार करण्यासाठी कच्चा माल कुठून आणत होता. आणि तो कोणाला विक्री करीत होता याचा  अधिक तपास पोलीस निरीक्षक किरण कबाडी करीत आहे.
Published by:sachin Salve
First published:

Tags: Bhiwandi

पुढील बातम्या