Home /News /maharashtra /

मध्य प्रदेशमधून कोट्यवधीचं ड्रग्स घेऊन येणाऱ्या महिलेला जळगावात पकडलं, पोलिसांनी मोठी कारवाई

मध्य प्रदेशमधून कोट्यवधीचं ड्रग्स घेऊन येणाऱ्या महिलेला जळगावात पकडलं, पोलिसांनी मोठी कारवाई

ताब्यात घेतलेल्या 45 वर्षीय महिलेसह आणखी एका जणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे,

ताब्यात घेतलेल्या 45 वर्षीय महिलेसह आणखी एका जणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे,

ताब्यात घेतलेल्या 45 वर्षीय महिलेसह आणखी एका जणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    जळगाव, 18 डिसेंबर : मुंबईमध्ये (mumbai) एकीकडे अंमली तस्करांच्या (drugs racket) टोळी सक्रिय झाल्या आहेत. तर दुसरीकडे जळगावमध्ये (jalgaon) ड्रग्स तस्करीची मोठी घटना समोर आली आहे. जळगाव जिल्ह्यातील रावेर (raver) येथे कोट्यवधी रुपयांचे ब्राऊन शुगर (Brown sugar) जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी एका महिलेला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यप्रदेशातील बऱ्हाणपूर येथील एका महिलेकडून जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 500 ग्रॅम ब्राऊन शुगर जप्त केले आहे.  सदर महिलेने बऱ्हाणपूर मध्य प्रदेश येथून रावेर येथे ब्राऊनशुगर घेवून येत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचत मध्यप्रदेशातील बऱ्हाणपूर येथील 45 वर्षे महिलेला 500 ग्रॅम ब्राऊन शुगरसह ताब्यात घेतले आहे. दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या ब्राऊनशुगरची किंमत ही कोट्यवधींच्या घरात असून या कारवाईमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. ताब्यात घेतलेल्या 45 वर्षीय महिलेसह आणखी एका जणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती  पोलीस अधीक्षक डॉ प्रविण मुंढे यांनी दिली. फिक्सिंग रोखण्यासाठी BCCI चे 'ब्रम्हास्त्र', खेळाडूंच्या अडचणी वाढणार! दरम्यान, राज्याच्या सीमेवर ड्रग्स सापडण्याची ही पहिली घटना नाही. मागील महिन्यात नांदेडमध्ये मुंबई एनसीबीच्या पथकाने नांदेडमध्ये गांजा घेऊन जाणारा ट्रक पकडला होता. आंध्रप्रदेश राज्यातील विशाखापटणम येथून गांजा महाराष्ट्रात येणार असल्याची गोपनीय माहिती एनसीबीला मिळाली होती. त्यानुसार मुंबई एनसीबीच एक पथक नांदेडमधील सीमावर्ती भागात तळ ठोकून होते. नांदेड जिल्ह्यातील देगलुर येथून गांजा भरून जाणारा ट्रक राज्यात दाखल झाला. एनसीबीच्या पथकाने तब्बल 22 किलोमिटर पाठलाग करत हा ट्रॅक पकडला. या ट्रकमध्ये तब्बल 101 किलो गांजा आढळला. गांजा घेऊन हा ट्रक जळगाव येथे जाणार होता. दरम्यान, ट्रक चालक गोकुळ नारायण राजपूत आणि सुनिल यादव महाजन यांना एनसीबीच्या पथकाने ताब्यात घेतलं होतं.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या