महाराष्ट्राला मान खाली घालायला लावणाऱ्या 5 आरोपींना अटक

महाराष्ट्राला मान खाली घालायला लावणाऱ्या 5 आरोपींना अटक

प्रेमी युगुलाला गावातील एका टोळक्याने मारहाण करीत मुलीशी अश्लील वर्तन केलं होतं.

  • Share this:

विजय कमळे पाटील, जालना, 1 फेब्रुवारी : गोंदेगाव येथे प्रेमी युगुलाला मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून 5 मुख्य आरोपींना अटक केली आहे. जालना शहरापासून जवळच असलेल्या गोंदेगाव शिवारात एका प्रेमी युगुलाला गावातील एका टोळक्याने मारहाण करीत मुलीशी अश्लील वर्तन केलं होतं. याप्रकरणी आता पोलिसांनी कारवाई केली आहे.

माथेफिरू टोळक्याने प्रेमी युगुलाला मारहाण करत त्याप्रकाराची मोबाईलमध्ये व्हिडिओ रिकॉर्डिंग करून तो विडिओ सोशल मीडियावर व्हायरल देखील केला होता. मन सुन्न करणाऱ्या या घटनेमुळे राज्यभर संताप व्यक्त केला जात असताना पोलीस मात्र याप्रकरणी कमालीचे अनभिज्ञ असल्याचं भयानक वास्तव काल समोर आलं होतं. 'न्यूज 18 लोकमत'ने बातमीच्या माध्यमातून काल दिवसभर याप्रकरणाचा सतत पाठपुरावा केल्यानंतर जागे झालेल्या पोलीस प्रशासनाने तपासाची चक्रे फिरवली.

याप्रकरणी पाचही मुख्य आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. या आरोपींवर विनयभंग, मारहाण आणि शिवीगाळ केल्याचं गुन्हा तालुका जालना पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेले सर्व आरोपी गोंदेगावाचे रहिवाशी असून त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

लहान भावाने 'ऑन द स्पॉट' घेतला बदला, बहिणीची छेड काढणाऱ्या गुंडाची केली हत्या

दरम्यान, हे प्रेमीयुगूल बुलडाण्यातील असल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्रात या व्हिडिओचा तीव्र प्रतिसाद उमटला. कायदा हातात घेण्याचा हक्क या तरुणांना कोणी दिला असा प्रश्न उपस्थित केला जात होता. हा व्हिडिओ माध्यमांमध्ये आल्यानंतर जालन्यातील पोलिसांनी याची दखल घेत तपास सुरू केला. याप्रकरणी पोलिसांनी आधी एका अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. कृष्णा वाघ असं ताब्यात घेतलेल्या आरोपीचं नाव आहे. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणातील 5 आरोपींना अटक केली.

First published: February 1, 2020, 6:43 PM IST

ताज्या बातम्या