मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /घर बांधणाऱ्या नागरिकाला धमकावलं, अंबरनाथमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या कुख्यात गुन्हेगाराला अटक

घर बांधणाऱ्या नागरिकाला धमकावलं, अंबरनाथमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या कुख्यात गुन्हेगाराला अटक

संजय पाटील या गुन्हेगाराने ठाणे जिल्ह्यातील विविध शहरात दहशत निर्माण केली होती.

संजय पाटील या गुन्हेगाराने ठाणे जिल्ह्यातील विविध शहरात दहशत निर्माण केली होती.

संजय पाटील या गुन्हेगाराने ठाणे जिल्ह्यातील विविध शहरात दहशत निर्माण केली होती.

अंबरनाथ, 2 मार्च : अंबरनाथ (Ambernath) शहरातील शिवाजी नगर पोलिसांनी कुख्यात गुन्हेगाराला अटक (Criminal Arrested By The Police) करून त्याच्याकडून पिस्टल आणि चार जिवंत काडतूस जप्त केली आहेत. संजय पाटील या गुन्हेगाराने ठाणे जिल्ह्यातील विविध शहरात दहशत निर्माण केली होती.

काही दिवसांपूर्वी अंबरनाथच्या शिवगंगानगर भागात नयन लोखंडे याने घराचे बांधकाम सुरू केले होते. त्याच वेळी संजय आणि त्याच्या तीन साथीदारांनी नयनला तू कोणाला विचारून बांधकाम सुरू केले. आम्ही इथले भाई आहोत. आताच जेलमधून बाहेर आलो आहे, अशी दमदाटी करून मारहाण केली.

या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पोलीस संजयचा शोध घेत होते. याच वेळी संजय हा अंबरनाथच्या सिद्धीविनायक नगर भागात आला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले असता त्याच्याकडे एक पिस्टल आणि चार जिवंत काडतूस आढळून आली.

हेही वाचा - नाशिकमधील धक्कादायक घटना, पोलिसांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचा तरुणाचा VIDEO व्हायरल

यापूर्वी संजयवर ठाणे, पनवेल, मुरबाड, अंबरनाथ या शहरात खून, खुनाचे प्रयत्न, मारामारी या सारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. शिवाजी नगर पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याच्याकडे पिस्टल आले कुठून आणि ती जवळ बाळगण्याचा त्याचा उद्देश काय होता याचा पोलीस तपास करीत आहेत.

First published:

Tags: Crime news