मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

नांदेड भरती घोटाळ्यानंतर पोलीस आणि सीआरपीएफची परीक्षा रद्द

नांदेड भरती घोटाळ्यानंतर पोलीस आणि सीआरपीएफची परीक्षा रद्द

 नव्याने होणाऱ्या लेखी परीक्षेसाठी दोषी परीक्षार्थीना बाद ठरवण्यात आलीये. लवकरच लेखी परीक्षेची तारीख जाहीर होणार आहे.

नांदेड, 02 मे : नांदेड पोलीस भरती घोटाळा उघड झाल्यानंतर राज्य राखीव पोलीस बल 2018 च्या प्रवेश परीक्षा रद्द करण्यात आल्याचं जाहीर करण्यात आलंय. तर नांदेडमध्ये पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेत गैरव्यवहार झाल्याचं उघडकीला आल्यानं ती लेखी परीक्षाच रद्द करण्यात आलीय. पुन्हा लेखी परीक्षा घेण्याचे आदेश नांदेडच्या पोलीस अधिक्षकांना मिळाले. एक मार्च रोजी झालेल्या लेखी परीक्षेत 13 परिक्षार्थीना पैसे घेऊन गूण वाढ केल्याचं निष्पन्न झालं. ओ एम आर पद्धतीने उत्तर पत्रिका स्कॅनिग करताना परिक्षार्थींना जास्त गूण देण्यात आले.  या प्रकरणी एस.एस.जी कंपनीच्या संचालकासह एकूण 20 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला तर 15 आरोपींना अटक करण्यात आलीये. मुख्य आरोपी प्रवीण भटकरसह पाच आरोपी अजून फरार आहेत. नव्याने होणाऱ्या लेखी परीक्षेसाठी दोषी परीक्षार्थीना बाद ठरवण्यात आलीये. लवकरच लेखी परीक्षेची तारीख जाहीर होणार आहे.
First published:

Tags: Nanded, Nanded recruitment scam, Police exam, नांदेड, पोलीस भरती

पुढील बातम्या