नवी मुंबई, पनवेलमध्ये 'जनता कर्फ्यू'च उल्लंघन, 18 जणांवर कारवाई

नवी मुंबई, पनवेलमध्ये 'जनता कर्फ्यू'च उल्लंघन, 18 जणांवर कारवाई

नवी मुंबई आणि पनवेल येथे मात्र, जनता कर्फ्यूच उल्लंघन करणाऱ्या 18 जणांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. पोलिसांनी 18 जणांना ताब्यात घेतलं असून नियम मोडल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • Share this:

नवी मुंबई, 22 मार्च: महाराष्ट्रासह भारतावर कोरोना व्हायरसचं संकट घोंगावत आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या आजच्या जनता कर्फ्यूला देशातील नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नागरिकांनी गच्चीवर, घराबाहेर व बाल्कनीजवळ येऊन टाळ्या, थाळीनाद कोरोनाशी दोन हात करणारे डॉक्टर, पोलिस आणि प्रशासनाचे आभार मानले. मात्र, नवी मुंबई आणि पनवेल येथे मात्र, जनता कर्फ्यूच उल्लंघन करणाऱ्या 18 जणांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. पोलिसांनी 18 जणांना ताब्यात घेतलं असून नियम मोडल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा...कंपनी मालकाने जपली सामाजिक बांधिलकी, मार्चमध्येच कर्मचाऱ्यांना एप्रिलचा पगार

जनता कर्फ्यू उद्या पहाटेपर्यंत राहणार

दरम्यान, कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 24 तासांत 22 ने वाढली आहे. कोरोना बाधितांची संख्या 75 वर पोहोचली आहे. आपल्याला या संकटावर मात करायची आहे, असं सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनता कर्फ्यू उद्या सकाळपर्यत वाढवला आहे. तसेच मुंबई, पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रभर जमाव बंदीचा कायदा (कलम 144) लागू करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. या निर्णयाची अंमलबजावणी उद्यापासून (सोमवार) होणार आहे. महाराष्ट्रातील कोणत्याही भागात 5 पेक्षा जास्त लोक एकत्र येऊ शकणार नाहीत. 5 पेक्षा जास्त लोक एका ठिकाणी जमल्यास त्यांच्यावर कारवाई होईल, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.

हेही वाचा...कोरोनाला घाबरू नका, या 10 गोष्टी करा म्हणजे तुमचा आत्मविश्वास नक्की वाढेल!

संपूर्ण महाराष्ट्रात लॉकडाऊन

संपूर्ण महाराष्ट्रात लॉकडाऊन करण्याचीही घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. 31 मार्चपर्यंत खासगी बस, एसटी, रेल्वे बंद राहणार आहेत. फक्त 5 टक्के कर्मचारी बाहेर काम करतील. 5 टक्के कर्मचारी संपूर्ण राज्याचा भार वाहतील. किमान पुढच्या 31 मार्चपर्यंत या नियमांचं पालन करा, असं आवाहन ही मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.

दरम्यान, महाराष्ट्रामध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. गेल्या काही तासांमध्ये मुंबई आणि पुण्यात कोरोनाचे नवे रुग्ण समोर आले आहे. मुबईत 6 तर पुण्यात 4 असे 10 नवीन रुग्णांचा पॉझिटिव्ह अहवाल आला आहे. त्यामुळे राज्यात भीतीचं वातावरण आहे. हे रुग्ण कोण आहेत आणि यांना कोरोनाची लागण कशी झाली याचा आता आरोग्य विभागाकडून तपास सुरू आहे. दरम्यान, आज कोरोनामुळे राज्यात आणखी एक मृत्यू झाला आहे.

कोरोनावर मात करण्यासाठी संपूर्ण देशात जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. असं असताना महाराष्ट्रामध्ये कोरोनाचा आणखी एक मृत्यू झाला आहे. मुंबईमध्ये कोरोनाचा दुसरा मृत्यू झाला. एका 56 वर्षीय रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. राज्यातील हा दुसरा मृत्यू आहे.

First published: March 22, 2020, 8:13 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading