कोल्हापुरात पोलिसांनी डाॅल्बीचे सेट फोडले, 3 मंडळांवर गुन्हे दाखल

कोल्हापुरात पोलिसांनी डाॅल्बीचे सेट फोडले, 3 मंडळांवर गुन्हे दाखल

कोल्हापूरमध्ये डॉल्बी लावणाऱ्या ३ गणेश मंडळांवर पोलिसांनी कडक कारवाई केलीये

  • Share this:

26 आॅगस्ट : कोल्हापूरमध्ये डॉल्बी लावणाऱ्या ३ गणेश मंडळांवर पोलिसांनी कडक कारवाई केलीये. ३ मंडळांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. डॉल्बी मालकावरही पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय.

पर्यावरण संरक्षण कायद्याअंतर्गत हे गुन्हे दाखल झालेत. पण अजून कुणालाही अटक झालेली नाही. ही सर्व गणेश मंडळं राजारामपुरी भागातली आहेत. सकाळी पोलिसांनी याच मंडळांमधल्या डॉल्बीचा सेटच तोडून टाकला. पोलिसांनी मिरवणुकीत डॉल्बीबंदी केली होती. तरीही राजारामपुरी भागात गणेश आगमनाच्या मिरवणुकीत डॉल्बी लावण्यात आला होता. ही माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी डॉल्बीचा सेट उधळून टाकला. पोलिसांच्या कारवाईमुळे कार्यकर्त्यांनी मिरवणूक बंद पाडली होती. पण पोलीस आपल्या भूमिकेवर ठाम राहिले.

First published: August 26, 2017, 5:14 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading