पोलादपूर ते जे.जे.हॉस्पिटल, एका मातेच्या मृत्यूची ह्रदयद्रावक कहाणी!

पोलादपूर ते जे.जे.हॉस्पिटल, एका मातेच्या मृत्यूची ह्रदयद्रावक कहाणी!

संकेत यांची आई सध्या त्याच्या दोन्ही मुलांचा सांभाळ करीत असून पोलादपूर, महाड आणि माणगाव इथली हॉस्पिटल आणि तिथल्या डॉक्टरामुळेच संकेतचा संसार उद्ध्वस्त झाला. सरकार आम्हा गरिबांना न्याय देणार का? असा सवाल करीत आहे.

  • Share this:

शैलेश पालकर, रायगड

रायगड, 07 डिसेंबर : राज्यात माता मृत्यूचे प्रमाण यापूर्वीच्या दरवर्षीच्या आकडेवारीपेक्षा कमी आल्याचा डंका आरोग्य विभागाकडून पिटला जात असताना पोलादपूर शहरातील एका बाळंतीण महिलेचा मृत्यू मुंबईत जे.जे. हॉस्पिटलमध्ये झाल्याची घटना घडली आहे.

पोलादपूर शहरातील तांबडभुवन भागातील एका कष्टकरी कुटुंबातील बाळंतीण महिलेची माणगाव उपजिल्हा रूग्णालयामध्ये सिझेरीयन प्रसुतीनंतर कुटूंब नियोजन शस्त्रक्रिया झाली.  मात्र, तिची तब्येत अत्यवस्थ झाल्याने तिला जे.जे.हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. तिथे तिचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.  मात्र, तिच्या कुटुंबीयांनी बाळंतिणीचा मृत्यू हा रायगड जिल्ह्यातील कुचकामी आरोग्य यंत्रणांमुळे झाला, असा आरोप केला आहे.  दरम्यान, मुंबईतील जे.जे. हॉस्पिटल येथील पोलिसांनी मृत बाळंतिणीच्या पतीकडून कोणावरही आक्षेप नसल्याचा जबाब घेतल्यानंतर मृत बाळंतिणीचे प्रेत ताब्यात दिले.

पोलादपूर शहरातील तांबडभुवन येथे अनेक वर्षे वास्तव्यास असलेले लाड कुटुंबीय दारिद्रय रेषेखालील आहे.  संकेत आणि त्याची पत्नी सोनल लाड या जोडप्याला तीन वर्षांची मुलगी असून तिघेही आई-वडील, भाऊ-वहिनी पुतण्या यांच्यासोबत एकत्र राहात असत. सोनल हिचे पहिले बाळंतपण सिझेरियन करावे लागले होते. दुसऱ्यांदा दिवस गेल्यानंतर नियमित तपासणी करण्यासाठी मनाली येरूणकर या आशासेविकेच्या मदतीने सोनल पोलादपूर ग्रामीण रूग्णालयामध्ये जात असे, अशी माहिती मृत सोनल हिचा पती संकेत लाड याने दिली.

संकेत यांची आई सध्या त्याच्या दोन्ही मुलांचा सांभाळ करीत असून पोलादपूर, महाड आणि माणगाव इथली हॉस्पिटल आणि तिथल्या डॉक्टरामुळेच संकेतचा संसार उद्ध्वस्त झाला. सरकार आम्हा गरिबांना न्याय देणार का? असा सवाल करीत आहे.

पोलादपूर ग्रामीण रुग्णालयामध्ये गायनॅक सर्जन असूनही सिझेरियन डिलिव्हरीची ऑपरेशन रूम आणि सुविधा अस्तित्वात नाही तर महाड येथील ट्रामा केअर हॉस्पिटलमध्ये सर्व सुविधा आहेत. मात्र, सिझेरियन डिलिव्हरी करणारे डॉक्टर नाहीत अशी परिस्थिती आहे. पोलादपूरच्या गायनॅक सर्जन डॉ. भाग्यरेखा पाटील यांनी महाड येथील रुग्णालयात प्रभारी म्हणून काम पाहिले आहे.

मात्र, तेथे त्या सिजरियन डिलिव्हरीचे ऑपरेशन करण्यासाठी का नाही गेल्या? त्यांनी स्वतः पेशंटला हाताळण्याऐवजी माणगाव उपजिल्हा रुग्णालयांमध्ये का पाठविले?  एक खाजगी ओमनी ॲम्बुलन्स आणि दोन 108 ॲम्बुलन्स बदलत बाळंतिणीला जे.जे. हॉस्पिटलमध्ये पोहोचविण्याचा खेळ कोणी खेळला? माणगाव उपजिल्हा रुग्णालयांमध्ये बाळंतिणीची लघवी अडली, असल्याचं सांगितलं गेलं असताना जे. जे. हॉस्पिटलमध्ये रक्ताच्या गाठी काढण्यात आल्या हे कसे? असे प्रश्न तिच्या कुटुंबीयांनी उपस्थितीत केले आहे.

दरम्यान, रायगड जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अजित गवळी यांच्याशी खातरजमा केली असता हा प्रसुतीदरम्यानचा मृत्यू असल्याची कबुली त्यांनी दिली.

 

 

First published: December 7, 2019, 9:05 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading