मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /पोलादपूरमध्ये वऱ्हाडाचा ट्रक 200 फूट दरीत कोसळला; 4 ठार, 35 जखमी

पोलादपूरमध्ये वऱ्हाडाचा ट्रक 200 फूट दरीत कोसळला; 4 ठार, 35 जखमी

रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यात कुडपन जवळ ट्रक दरीत कोसळला आहे.

रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यात कुडपन जवळ ट्रक दरीत कोसळला आहे.

रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यात कुडपन जवळ ट्रक दरीत कोसळला आहे.

  रायगड, 8 जानेवारी : रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यात वऱ्हाडाच्या ट्रकला भीषण अपघात झाला आहे. हा ट्रक थेट 200 फूट दरीत कोसळला असून 4 जण जागीच ठार झाले आहेत, तर अंदाजे 30 ते 35 जण जखमी असल्याची माहिती आहे. मदतकार्यासाठी डॉक्टरांची टीम रवाना झाली.

  पोलादपूर तालुक्यातील दुर्गम कुडपण धनगरवाडी जवळील वळणावर वऱ्हाडाच्या ट्रकला हा अपघात झाला. या ट्रकमधून जवळपास 100 जण प्रवास करत असल्याचं समजते. वळणावर चालकाचं नियंत्रण सुटल्याने ट्रक दरीत कोसळला. या अपघाताची माहिती मिळताच महाड जवान मदतकार्यासाठी रवाना झाले. महाडची रेस्क्यू टीमही घटनास्थळाकडे रवाना झाली. मात्र महामार्गाची कामं... ग्रामीण भागातील अंतर्गत जोडलेले रस्ते आणि त्यात पाऊस यामुळे प्रशासनाची टीम पोहोचायला उशीर झाला.

  पोलादपूर तालुक्यातील खडपी गावातून लग्नाचे वऱ्हाड कुडपण येथे गेले होते. लग्न लावून परत येताना हा आपघात झाला. 150 ते 200 फूट दरीत ट्रक कोसळला असून मृतांच्या संख्येत वाढ होण्याची भीती वर्तवण्यात येत आहे.

  काळोख असल्याने मदत कार्यात अडथळे येत असल्याचं कळतंय. या अपघातातील काही लोक रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील खवटी, धनगरवाडी येथील असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. खेडमधून रेस्क्यू टीम आणि शासकीय अधिकारी घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत. ट्रकमध्ये नवरा-नवरी नव्हते, तर नवऱ्याचे भाऊ आणि खवटी गावातील लोक होते.

  काल महाड तालुक्यात आकले गावाजवळ वऱ्हाडाची बस पलटी झाली होती. त्यामध्ये 15 जखमी झाले होते. त्यानंतर आज पोलादपूर तालुक्यात कुडपन जवळ ट्रक दरीत कोसळला आहे.

  First published:

  Tags: Breaking News