मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

VIDEO : चिमुकलीने रोखली पावले, म्हणून तो वाचला

VIDEO : चिमुकलीने रोखली पावले, म्हणून तो वाचला

सहलीसाठी महाबळेश्वरला निघालेल्यांच्या या यादीमध्ये आणखी एक नाव होते ते म्हणजे याच विद्यापीठाचे कर्मचारी रविकिरण साळवी यांचे.

सहलीसाठी महाबळेश्वरला निघालेल्यांच्या या यादीमध्ये आणखी एक नाव होते ते म्हणजे याच विद्यापीठाचे कर्मचारी रविकिरण साळवी यांचे.

सहलीसाठी महाबळेश्वरला निघालेल्यांच्या या यादीमध्ये आणखी एक नाव होते ते म्हणजे याच विद्यापीठाचे कर्मचारी रविकिरण साळवी यांचे.

रत्नागिरी, ता. 28 जुलै : रायगडच्या पोलादपूर-महाबळेश्वर मार्गावर शनिवारी सकाळी आंबेनळी घाटात 800 फूट खोल दरीत बस कोसळून झालेल्या दुर्घटनेत कोकण कृषी विद्यापीठाच्या 33 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. सहलीसाठी महाबळेश्वरला निघालेल्यांच्या या यादीमध्ये आणखी एक नाव होते ते म्हणजे याच विद्यापीठाचे कर्मचारी रविकिरण साळवी यांचे. पण, 'घरात तान्हुली मुलगी आहे, तू जाऊ नकोस', असे आईने म्हणाताच तीचा शब्द पाळणाऱ्या रविकिरण याचं दैव बलवत्तर ठरलंय.

आपल्या स्वार्थासाठी चिमुकल्यांचा बळी घेण्याची असंख्य उदाहरणे आजतागायत आपल्या ऐकण्या-वाचण्यात आली असतील. पण, एका चिमुकलीने तीच्या पित्याचे प्राण वाचविल्याचं उदाहरण क्वचित ऐकली-वाचली असतील. पोलादपूर-महाबळेश्वर बस दुर्घटनेमुळे असंच एक उदाहरण समोर आलंय. महाबळेश्वरला सहलीला जाण्याची यादी 15 दिवसापूर्वीच तयार झाली होती. त्यात याच विद्यापीठाचे कर्मचारी रविकिरण साळवी यांचे देखील नाव होते. पण, शनिवारी पहाटे रविकिरण यांनी सहलीला निघण्यापूर्वी आपल्या गोंडस मुलीला जवळ घेताच, त्यांच्या आईच्या मनात पाल चुकचुकली. त्यांनी घरात तान्हुली मुलगी आहे, तू नाही गेलास तर नाही का चालणार? असे म्हणताच रविकिरण विचारात पडले. चिमुकलीच्या पापा घेत त्यांनी ठिक आहे नाही जात, असं सांगून त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना आपण येत नसल्याचं कळवलं.

Bus Accident Update : एनडीआरएफ टीमकडून रात्रीही बचावकार्य सुरू राहणार

नशिबात काय लिहीलंय हे कुणालाच ठाऊक नसतं. येथे रविकिरण याचं दैव बलवत्तर ठरलं. सहलीसाठी निघालेल्या बसमधील प्रकाश सावंत-देसाई वगळले तर रविकिरणच्या इतर सर्व सहकारी-मित्रांचा दुर्दैवी मृत्यू झाला. केवळ चिमुकलीची ओढ आणि आईला दिलेला होकार यांमुळेच आज मी जीवंत असल्याची प्रतिक्रिया रविकिरण साळवी यांनी न्यूज18 लोकमतला दिली.

PHOTOS : अपघातापूर्वीचे अखेरचे 'ते' बसमधील फोटो

PHOTOS : आंबेनळी घाट, मृतदेह आणि बचावकार्य

First published:

Tags: Dapoli, दापोली, महाबळेश्वर, रायगड