शैलेश पालकर, पोलादपूर, 17 नोव्हेंबर : पोलादपूर शहराजवळ अॅक्टिवा स्कूटरने उभ्या असलेल्या कंटेनरला मागून धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात सख्ख्ये भाऊ गंभीर जखमी झाले होते. यातील एकाचा मृत्यू झाला आहे. अमित रघुनाथ शिंदे असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे.
पोलादपूर जवळ मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील एका ढाब्याजवळ जेवणासाठी थांबलेल्या कंटेनरला पोलादपूरच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या अॅक्टिवा स्कूटरने धडक दिली. दुपारी एक वाजता घडलेल्या या अपघातात पोलादपूर तालुक्यातील खडपी येथील अमित रघुनाथ शिंदे आणि गणेश रघुनाथ शिंदे हे दोघे भाऊ जखमी झाले.
स्कूटरचालक अमित शिंदे याची प्रकृती गंभीर असल्याने त्याच्यावर पुढील उपचार करण्यासाठी मुंबईला रवाना करण्यात आले. मात्र, महाड येथे पोहोचताना त्याची प्रकृती ढासळली आणि ट्रामाकेअर सेंटर तसंच खासगी हॉस्पिटलमध्ये डॉक्टर्स उपलब्ध न झाल्याने महाड येथेच अमित शिंदे याने प्राण सोडले.
या अपघातात जखमी झालेल्या गणेश शिंदे यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, अमितच्या निधनाची बातमी कळाल्यानंतर कुटुंबांनी मोठा आक्रोश केला. घरातील तरुण मुलगा अपघातात गमावल्याने शिंदे कुटुंबावर दुख:चा डोंगर कोसळला आहे.
Special Report : 'ती' परत येतेय... नव्या स्वरूपात आणि नवं तंत्रज्ञान घेऊन
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा