मासे पकडण्याच्या वादातून धरणांमध्ये कालवलं जातंय विष, नागरिकांच्या जीवाशी खेळ

याच धरणामधलं पाणी पिण्यासाठी वापरलं जात असल्याने नागरिकांच्या आरोग्यालाच धोका निर्माण झालाय.

News18 Lokmat | Updated On: Jul 26, 2019 07:42 PM IST

मासे पकडण्याच्या वादातून धरणांमध्ये कालवलं जातंय विष, नागरिकांच्या जीवाशी खेळ

भास्कर मेहरे, यवतमाळ 26 जुलै : व्यवसायातली जीवघेणी स्पर्धा आणि जास्त पैसे कमविण्याच्या हव्यासापोटी यवतमाळ जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. मत्स्यव्यवसाय होत असलेल्या धरणांमध्ये विषप्रयोगाचे प्रकार उघड झाले असून  मत्स्यव्यवसायिकांनी दोषींवर कारवाईची मागणी केलीय. गोकी प्रकल्प आणि अरुणावती प्रकल्पात विष प्रयोग झाल्याच्या तक्रारी पोलिसांकडे झाल्याने खळबळ उडाली आहे. हा प्रकार म्हणजे नागरिकांच्या जीवाशी खेळच आहे असा संताप नागरिकांनी व्यक्त केलाय.

अखेर मुंबई काँग्रेसला मिळाला नवा कार्याध्यक्ष, काँग्रेसनं खेळला खास डाव

या विषप्रयोगामुळे प्रकल्पामधल्या जलचर प्राण्यांचाही मृत्यू झाल्याची बाब कंत्राटदार कंपनीच्या लक्षात आली आहे. अवैध मासेमारी करिता व व्यावसायिक स्पर्धेतून धरणाच्या पाण्यात असे विषप्रयोग होत आहेत. गोकी धरणाच्या 860 हेक्टर क्षेत्रातून मत्स्यव्यवसायासाठी गोपालकृष्ण भूजलाशयीन मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थेला मासेमारीचं कंत्राट देण्यात आलं होतं.

शेतजमिनीच्या वाटणीवरून मुलाने बापाची हत्या करून कुत्र्यांना खाऊ घातले मांस

गेली काही वर्ष पाऊस कमी झाल्यामुळे तुलनेने धरणांमध्ये पाण्याचा साठा कमी आहे. हेच पाणी शहरांनाही  पिण्यासाठी वापरण्यात येत असतं. पाण्यात विषारी घटक टाकून मेलेले मासे जमा करून ते विकण्याचा अवैध धंदा काही लोकांनी सुरु केल्याची तक्रार गेले काही महिने करण्यात येतेय. पण त्याकडे दुर्लक्ष झाल्याने सुरक्षेलाच धोका निर्माण झालाय.

Loading...

ठाणे डोंबिवली रेल्वे प्रवास ठरला मृत्यूचा सापळा, दरवर्षी 700पेक्षा जास्त मृत्यू

प्रकल्पामध्ये सदस्यांकडून गस्त असतानाही पाण्यात विष कालवण्यात आल्याचं स्पष्ट झालं. विशेष म्हणजे गोकी धरणातून यवतमाळ शहरात देखील पाणीपुरवठा होतो. त्यामुळे विषप्रयोगाच्या तक्रारीमुळे नागरिकांमध्ये देखील धास्ती निर्माण झालीय. भातात विष मिसळून ही मासेमारी होत असल्याची माहिती असून विषप्रयोगाने मृत मासे बाजारात विकल्या जात आहे का? याची तपासणी करण्याची मागणीही नागरिकांनी केलीय. गोकी व अरुणावती प्रकल्पातील मासे आणि झिंगे यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचा तपास करण्याची मागणी विविध संघटनांनी केलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: fishing
First Published: Jul 26, 2019 07:42 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...