मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

धक्कादायक! नाशिकरांची तहान भागवणाऱ्या धरणात मिसळलं विषारी औषध

धक्कादायक! नाशिकरांची तहान भागवणाऱ्या धरणात मिसळलं विषारी औषध

नाशिकरांच्या पाण्यात कोण मिसळवतय विष?

नाशिकरांच्या पाण्यात कोण मिसळवतय विष?

नाशिकरांच्या पाण्यात कोण मिसळवतय विष?

नाशिक, 6 जून: नाशिकरांची तहान भागवणाऱ्या मुकणे धरणात अवैद्य मासेमारीसाठी विषारी औषधांचा वापर होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी 2 जणांना अटक केली आहे. मात्र, या प्रकारामुळे नाशिकरांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याची धक्कादायर बाब समोर आल्यानं शहरासह जिल्ह्यात भीती परसरली आहे. हेही वाचा.. नाशिकरांच्या पाण्यात कोण मिसळवतय विष? मुकणे धरणातून नाशिकसह परिसराला पाणी पुरवठा करण्यात येतो. मात्र, या धरणाच्या पाण्यात विषारी औषधांची फवारणी करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी 2 जणांना अटक केल्यानंतर महानगरपालिका प्रशासनाची झोप उडाली आहे. मुकणे धरणातून नाशिक शहराला पाणीपुरवठा केला जातो. धरणातील गोड्या पाण्याने नाशिकरांची तहान भागवली जाते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून या धरणात विषारी औषध फवारले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नाशिक शहरालगत असलेल्या या धरणात शासनाकडून परवानगी घेऊन काही लोक मत्स्य व्यवसाय करत आहेत. मात्र, याच व्यावसायिकांच्या उत्पन्नावर डोळा ठेवत मुंबईच्या काही टोळ्या स्थानिक टवाळखरोच्यां मदतीने या धरणातील लाखो रुपये किंमतीचे हे मासे चोरी करण्याच्या उद्देशाने या धरणात विषारी औषधांची फावरणी करत आहे. त्यामुळे या धरणातील पाणी पूर्णतः दूषित झालं असून या धरणावर पाणी पिण्यासाठी जाणाऱ्या निष्पाप जनावरांनाही या मासे तस्करीमुळे आपला जीव गमवावा लागला आहे. विशेष म्हणजे स्थानिक नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी या भागात अवैधपणे मासेमारी करण्यासाठी औषध करणाऱ्या काही टवाळखोरांना रंगेहात अटकही केली आहे. मात्र, या टवाळखोरांना ही तस्करी करण्याचे काम देणारे म्होरके मात्र पोलिसांना शोधता आले नाही. पोलिसांनी या प्रकरणी जलसंपदा आणि महानगरपालिका प्रशासनाला पत्रव्यव्हार करत धरणाच्या सुरक्षेत वाढ करण्याचे आदेश दिले आहे. नाशिकरांच्या जीवाशी सुरू असलेला खेळ कोण थांबवणार? दरम्यान, या सर्व प्रकाराने नाशिकरांच्या जीविताशी सुरु असलेला हा खेळ कोण थांबवणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या घटनेनंतर पालिका प्रशासनाची झोप उडाली आहे. महानगरपालिकेने या धरणातील पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवले आहे. मात्र, पैशांच्या हव्यासा पोटी नाशिककरांच्या पाण्यात विष कालवणाऱ्या टोळ्यांमधील छोटे मासे पोलिसांच्या गळाला लागले असले तरी बडे मासे मात्र पोलिसांच्या ताब्यात आलेले नाही. त्यामुळे जोपर्यंत या प्रकरणातील म्होरके गजाआड होत नाही तोपर्यंत नाशिककरांच्या जीविताशी सुरू असलेला हा खेळ असाच सुरू राहणार आहे. त्या मुळे या प्रकरणातील म्होरके शोधून त्यांच्यावर कारवाई करण्याचाही गरज आहे.
Published by:Sandip Parolekar
First published:

Tags: Nashik

पुढील बातम्या