कवी बा.सी.मर्ढेकरांचं गाव होणार कवितेचं गाव

कवी बा.सी.मर्ढेकरांचं गाव होणार कवितेचं गाव

मर्ढे गाव हे कवितेचं गाव आणि वाङमयीन पर्यटन स्थळ व्हावं म्हणून मुख्यमंत्री कार्यालयाने हिरवा कंदील दिला आहे. त्यामुळे आता पुस्तकांच्या गावाप्रमाणे कवितेचं गावही सातारा जिल्ह्यात होणार आहे.

  • Share this:

सातारा,19 सप्टेंबर: युगप्रवर्तक कवी बा.सी मर्ढेकर यांचं सातारा जिल्ह्यातील मर्ढे गाव हे कवितेचं गाव आणि वाङमयीन पर्यटन स्थळ व्हावं म्हणून मुख्यमंत्री कार्यालयाने हिरवा कंदील दिला आहे. त्यामुळे आता पुस्तकांच्या गावाप्रमाणे कवितेचं गावही सातारा जिल्ह्यात होणार आहे.

साहित्यामध्ये एक नवा पंथ तयार करणारे कवी म्हणजे बा.सी.मर्ढेकर. त्यांचं मुळ गाव मर्ढे हे कवितेचं गाव व्हावं अशी अनेक साहित्यप्रेमींची इच्छा आहे. त्यानुसार महाराष्ट्र साहित्य परिषदेने हे गाव कवितेचं गाव म्हणून विकसित करावं असा एक प्रस्तावही शासन दरबारी दाखल केला होता. सध्या या प्रस्तावाला मुख्यमंत्री कार्यालयाने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. हा प्रस्ताव पुढील कारवाईसाठी मुख्यमंत्री कार्यालयाने सांस्कृतिक आणि पर्यटन विभागाकडे पाठवला आहे अशी माहिती महाराष्ट्र साहित्य परिषदेचे मुख्य कार्यवाह मिलिंद जोशी यांनी दिली आहे. मर्ढे गावही सातारा जिल्ह्यात असल्यानं पुस्तकाच्या गावाचा आणि कवितेच्या गावाचा दुहेरी मान सातारा जिल्ह्याला मिळणार आहे

First published: September 19, 2017, 11:04 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading