Home /News /maharashtra /

पुणे विमानतळावरील प्रवाशांचं क्वारंटाइन बंधनकारक, PMPML सेवाही हळूहळू करणार बंद

पुणे विमानतळावरील प्रवाशांचं क्वारंटाइन बंधनकारक, PMPML सेवाही हळूहळू करणार बंद

पुणे विभागीय आयुक्तांनी पत्रकार परिषेत महत्त्वपूर्ण गोष्टींचा खुलासा केला

    पुणे, 19 मार्च : देशभरात कोरोनाचा (Coronavirus) विळखा वाढत आहे. त्यादृष्टीने राज्य सरकारकडून उपाययोजना केल्या जात आहे. कोरोनाचा (Covid - 19) संसर्ग वाढू नये यासाठी अनेक बाबींवर नियंत्रण आणले जात आहे. आज पुण्याच्या (Pune) आयुक्तांनी पत्रकार परिषद घेत  कोरोनासंदर्भातील महत्त्वाच्या सूचना केल्या. यावेळी पुण्याचे विभागीय आयुक्त दीपक म्हैसकर यांनी सांगितले की सध्या पुण्यात 19 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी पुणे विमानतळावरुन (Pune Airport) क्वारंटाइन बंधनकारक करण्यात आलं आहे. विमानाने आलेल्या प्रवाशांना थेट घरी सोडलं जाणार नाही तर त्यांना क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात येईल. याशिवाय रुग्णालय प्रशासनाला कोरोनासंदर्भात नागरिकांकडे लक्ष देता यावं यासाठी तातडीने नसलेल्या शस्त्रक्रिया पुढे ढकलण्याची सूचना देण्यात आली आहे. याशिवाय पुण्यात पुरेसे मास्क उपलब्ध असून याचा तुटवडा नाही. संबंधित - आता 'हा' देश कोरोनाचा पुढचा लक्ष्य, एकाच शहरात दिवसभरात तब्बल 1 हजार रुग्ण यावर आयुक्त पुढे असंही म्हणाले की, आतापर्यंत 1 लाख 74 हजार 323 व्यक्तींची कोरोनासंदर्भात तपासणी करण्यात आली असून यातील 10 जणांना पुढील तपासणीसाठी नायडू रुग्णालयात पाठविण्यात आलं आहे. इतर दिवशी पुणे विमानतळावर दिवसाला 110 विमानं येतात याची संख्या कमी करण्यात आली असून हा आकडा 68 वर पोहोचला आहे. याशिवाय पुणे स्टेशनहून सुटणाऱ्या रेल्वेतही कपात करण्यात आली आहे. सेतू केंद, निबंधक कार्यालयं उद्यापासून बंद करण्यात येणार आहे. संबंधित - कोरोनामुळे रेल्वेने घेतला मोठा निर्णय, आता तिकिटावर मिळणार नाही कोणतीही सूट
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Corona virus in india

    पुढील बातम्या