पुण्यात पीएमपी बसचे ब्रेक निकामी.. सुसाट सुटलेली बस थेट घुसली हॉटेलात

पुण्यात पीएमपी बसचे ब्रेक निकामी.. सुसाट सुटलेली बस थेट घुसली हॉटेलात

सिंहगड कॉलेजच्या तीव्र उतारावरून सुसाट सुटलेली पीएमपी बस (एमएच-12.एफसी.9435) थेट एका हॉटेलमध्ये घुसली. ही घटना गुरुवारी (ता.15) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास वडगाव बुद्रुक येथे घडली.

  • Share this:

पुणे, 17 मे- सिंहगड कॉलेजच्या तीव्र उतारावरून सुसाट सुटलेली पीएमपी बस (एमएच-12.एफसी.9435) थेट एका हॉटेलमध्ये घुसली. ही घटना गुरुवारी (ता.15) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास वडगाव बुद्रुक येथे घडली. ब्रेक निकामी झाल्यामुळे हा अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. सिंहगड कॉलेज बस थांब्यावरून बस स्वारगेटकडे जात असताना उतारावरून खाली येत असताना तिचे ब्रेक निकामी झाले. बस उतारावरून वेगाने आल्याने कठड्याला धडकून ती हॉटेलमध्ये घुसली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बसचालक सोपान शिवराम जांभळे व वाहक मोहन शिवदास दहिवळ हे पावणेचार वाजता सिंहगड कॉलेज बस थांब्यावरून घेऊन स्वारगेटकडे जात असताना कॉलेजच्या उतारावरून खाली येत असताना ब्रेक निकामी झाल्याचे चालकाच्या लक्षात आले. त्यानंतर चालकाने बस रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या कठड्याला धडकावली. परंतु, बस उतारावरून वेगाने आल्याने कठड्याला धडकून हॉटेलमध्ये शिरली. यात बस आणि हॉटेलचे मोठे नुकसान झाले आहे.

पुण्यात कोयता, लोखंडी रॉडने वाहनांची तोडफोड

दुसरीकडे, पुण्यात कोयता, लोखंडी रॉडने वाहनांची तोडफोड करण्याच्या प्रकारांत वाढ झाली आहे. पहाटे काही समाजकंटकांनी 13 वाहनांची तोडफोड केली. कोयता, लोखंडी रॉड आणि काठ्यांनी काचा फोडल्या. समाजकंटकांनी सोमवार पेठेत आणि सात तोटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हैदोस घातला. सोमवार पेठेत 11 गाड्यांची तर सात तोटी पोलीस चौकी समोर 2 गाड्या फोडल्या. शहराच्या मध्यवस्तीत समाजकंटकांनी गाड्यांचा चुराडा केला. समाजकंटकांच्या हा हैदोसात काही लाखांचं नुकसान झालं आहे.

VIDEO: पुण्यात ब्रेक फेल झाल्यानं बस थेट हॉटेलमध्येच शिरली

First published: May 17, 2019, 3:40 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading