पीएमपी बस ड्रायव्हरचा TikTok VIDEO झाला भारी, पण प्रशासनाने पाठवलं घरी!

पीएमपी बस ड्रायव्हरचा TikTok VIDEO झाला भारी, पण प्रशासनाने पाठवलं घरी!

ड्रायव्हरच असे करायला लागले तर प्रवासी ही तसंच करतील, अशी भूमिका पीएमपीएमएल प्रशासनाने घेतली.

  • Share this:

पुणे, 24 जानेवारी : तरुण आणि तरुणींना टीकटॉकवर TikTok व्हिडिओ तयार करण्याचं जणू व्यसनच जडलं आहे.  TikTok वर व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे काही जण तर रातोरात्र स्टारही झाले आहे. पुण्यातील पीएमपीएमएल ई-बसचालकाला TikTok वर व्हिडिओ करण्याचा मोह आवरला नाही. पण, त्याला हा व्हिडिओ करणे चांगलेच महागात पडले आहे.

पीएमपीएमएल ई-बसच्या भेकराईनगर डेपोच्या ड्रायव्हरने टिकटॉक व्हिडिओ केला होता. पीएमपीच्या ई-बसला सजवून त्याने बस सोबत  व्हिडिओ तयार केले होते. त्याचे व्हिडिओ  बघता बघता हे चांगलेच व्हायरल झाले. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाने याची दखल घेतली. टिकटॉकवर व्हिडिओ करणाऱ्या या ड्रायव्हरवर प्रशासनाने  निलंबन आणि चौकशीची कारवाई केली. त्यानंतर त्याला बडतर्फही केलं.

पीएमपीएमएल बस ही सार्वजनिक मालमत्ता आहे. बसमध्ये आणि डेपो परिसरात किंवा बससमोर अशा प्रकारचे व्हिडिओ बनवणे हा गैरप्रकार आहे. याला कृपया प्रोत्साहन देऊ नका, अन्यथा  उद्या कोणीही  या नव्या आलेल्या  बसचे  नुकसान करू शकतो, असं प्रशासनाने स्पष्ट केलंय.

तसंच पीएमपीएमएल ई बस डेपो इतर राज्यांसाठी आदर्श डेपो आहे. तो पाहण्यासाठी इतर राज्यासह काही परदेशी लोकांनी देखील भेटी दिल्या आहेत. असे व्हिडिओ व्हायरल झाल्यास संस्थेची प्रतिमा नक्कीच मलीन होणार आहे, याबरोबरच शहराची देखील. त्यामुळे हे चुकीचं आहे. ड्रायव्हर असं करत असतील, तर उद्या सगळेच असं करायला लागतील, अशी भीतीही प्रशासनाने व्यक्त केली.

टीकटॉकवर व्हिडिओ टाकल्यामुळे ड्रायव्हरवर झालेल्या कारवाईमुळे  समाजमाध्यमात मात्र याबाबत वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. पण, ड्रायव्हरच असे करायला लागले तर प्रवासी ही तसंच करतील, अशी भूमिका पीएमपीएमएल प्रशासनाने घेतली.

ई बस चालकाने तयार केलेल्या टिकटॉक संदर्भात  पीएमपीएमएलचे वाहतूक व्यवस्थापक अनंत वाघमारे

यांनी प्रतिक्रिया दिली. 'अशा प्रकारे सार्वजनिक मालमत्तेचा गैरवापर करणे चुकीचे आहे. सदर चालक आणि ई-बस ठेकेदाराला तंबी देण्यात येणार आहे. कर्मचाऱ्यांनी अशा प्रकारे सार्वजनिक मालमत्तेचा गैर वापर करू नये. असे करताना आढळल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असं अनंत वाघमारे यांनी सांगितलं.

First published: January 24, 2020, 8:57 PM IST
Tags:

ताज्या बातम्या