कर्जमाफी प्रकियेतील आधार कार्ड घोळाची थेट 'पीएमओ'कडून दखल, राज्याकडे मागितला अहवाल

कर्जमाफी प्रकियेतील आधार कार्ड घोळाची थेट 'पीएमओ'कडून दखल, राज्याकडे मागितला अहवाल

कर्जमाफीच्या प्रक्रियेत 183 जणांना एकच आधार कार्ड नंबर लिहिला गेला होता

  • Share this:

28 ऑक्टोबर: कर्जमाफी देण्याच्या प्रक्रियेत आधार क्रमांकाचे घोळ झाल्याची बातमी आयबीएन लोकमतनं दाखवली होती. त्याची दखल आता थेट पंतप्रधान कार्यालयानं घेतलीय. पंतप्रधान कार्यालयाकडून राज्य सरकारला विचारणा केलीय.

कर्जमाफीच्या प्रक्रियेत 183 जणांना एकच आधार कार्ड नंबर लिहिला गेला होता. तर अनेकांच्या आधार कार्डनंमध्ये 6च आकडे लिहिले होते.आधार कार्डची माहिती चुकीची भरल्याने योग्य शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार कशी असा सवाल विचारला जातोय. यासंदर्भात केंद्राने राज्य सरकारला विचारणा केली आहे. याबाबत राज्याच्या आयटी विभागानं स्पष्टीकरण दिलं होतं पण त्यावर पीएमओचं समाधान झालं नाही. या घोळामुळे डिजीटल इंडियाच्या संकल्पनेला धक्का बसलाय. त्यामुळे पीएमओनं याची दखल घेतलीय. आणि राज्य सरकारकडे जाहीर नाराजी व्यक्त केलीय.

First published: October 28, 2017, 10:52 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading