PMC बँक घोटाळाप्रकरणी भाजपच्या माजी आमदाराच्या मुलाला अटक, मुंबई पोलिसांची मोठी कारवाई

PMC बँक घोटाळाप्रकरणी भाजपच्या माजी आमदाराच्या मुलाला अटक, मुंबई पोलिसांची मोठी कारवाई

पीएमसी बँकेचे माजी संचालक आणि भाजपचे माजी आमदार तारा सिंग यांचा मुलगा रजनीत सिंग यांना मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (ईओडब्ल्यू) अटक केली आहे.

  • Share this:

मुंबई, 16 नोव्हेंबर : PMC बँके घोटाळ्याप्रकरणी पीएमसी बँकेचे माजी संचालक आणि भाजपचे माजी आमदार तारा सिंग यांचा मुलगा रजनीत सिंग यांना मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (ईओडब्ल्यू) अटक केली आहे. मुंबई पोलिसांकडून त्यांची कसून चौकशी करण्यात येणार आहे. या प्रकरणात 3 HDIL चे संचालक राकेश वाधवान आणि सारंग वाधवान यांना अटक करण्यात आली होती. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली होती. या संचालकांची 3 हजार 500 कोटींची मालमत्ता गोठवण्यात आली होती.

MC बँकेचे अधिकारी आणि HDIL च्या अधिकाऱ्यांनी केलेल्या गैरव्यवहारामुळे 4 हजार 355 कोटींचं नुकसान झालं, असं आढळून आलं होतं. PMC बँकेचे माजी संचालक जॉय थॉमस आणि अध्यक्ष वरियम सिंग आणि HDIL चे राकेश वाधवान, सारंग वाधवान यांची FIR मध्ये नावं होती. पंजाब अँड महाराष्ट्र को ऑपरेटिव्ह बँकेवर रिझर्व्ह बँकेने 6 महिन्यांसाठी निर्बंध घातले. या बँकेच्या खातेदारांची खाती गोठवण्यात आली. त्यानंतर या बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक जॉय थॉमस यांच्याविरोधात मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला. जसबीर सिंह मठ्ठा यांनी या प्रकरणी दिलेल्या तक्रारीवरून आर्थिक गुन्हे शाखेकडे हा फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान, PMC बँकेचा घोटाळा ताजा असताना CBIने महाराष्ट्रासह देशभरात छापे टाकून मोठी कारवाई केली. देशभरातल्या विविध बँकांमध्ये तब्बल 7 हजार कोटींपेक्षा जास्त रकमेचा हा घोटाळा असून त्यात अनेक बडे मासे अडकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बँक घोटाळ्यांच्या 35 प्रकरणी CBIकडे गुन्हा नोंदवला गेला. त्याच्या तपासासाठी ही कारवाई करण्यात आली असून विविध राज्यांमध्ये 169 ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत.

या CBIने आक्षेपार्ह कागदपत्र, महत्त्वांच्या फाईल्स, लॅपटॉप, हार्डडिस्क आणि इतर कागदपत्र जप्त केली आहेत. बँकेच्या संचालक मंडळावर असलेल्या लोकांनी आपल्या नातेवाईक आणि संबंधीत लोकांना भरमसाठ कर्ज वाटायची आणि ती नंतर भरायचीच नाही असा उद्योग अनेक ठिकाणी सुरू होता.

या घोटाळात सामान्य ठेविदारांचे कोट्यवधी रुपये पाण्यात जाण्याची शक्यता आहे. रिझर्व्ह बँकेनेही निर्बंध आणल्याने अनेक बँकांमध्ये लोकांना पैसे काढणही अवघड झालं. अशा घटना घडत राहिल्याच लोकांचा बँकिंग सिस्टिमवरचा विश्वासच उडण्याची भिती व्यक्त केली जाते. त्यामुळे सर्वच बँकांनी आपल्या व्यवहारात सुधारणा करत पारदर्शकता आणावी असे निर्देश रिझर्व्ह बँकेकडून देण्यात आले होते.

Tags:
First Published: Nov 16, 2019 08:44 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading