...तर महाराष्ट्राच्या राजकारणात होऊ शकतो भूकंप, PMC बँक घोटाळ्यात नेत्यांना घरांची भेट

...तर महाराष्ट्राच्या राजकारणात होऊ शकतो भूकंप, PMC बँक घोटाळ्यात नेत्यांना घरांची भेट

राज्यातल्या विविध शहरांमध्ये ही घरं असल्याची शक्यताही व्यक्त केली जातेय. EDकडे या नेत्यांची नावं असून त्याबाबत अतिशय गुप्तता बाळगण्यात येत आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली 07 ऑक्टोंबर : पंजाब आणि महाराष्ट्र बँक घोटाळाप्रकरणी (Punjab Maharashtra Cooperative (PMC) Bank fraud case) दररोज नवं नवे खुलासे होत आहेत.  4 हजार 355 कोटींचा हा घोटाळा असल्याचा आरोप होत असून या प्रकरणी HDIL चे संचालक राकेश वाधवान(Rakesh Wadhawan ) आणि त्यांचा मुलगा सारंग यांच्या विरुद्ध मनिलॉड्रींगचा गुन्हाही दाखल करण्यात आला होता. आता ED (Enforcement Directorate )ने वाधवान यांच्या जवळच्या लोकांवर सोमवारी छापे टाकले. त्या छाप्यांमध्ये अनेक खळबळजनक गोष्टी बाहेर आल्या आहेत. या छाप्यांमध्ये ED च्या हातात अनेक धक्कादायक गोष्टी हाती लागल्या आहेत. HDIL (Housing Development and Infrastructure Ltd ) च्या मालकांनी महाराष्ट्रातल्या काही नेत्यांना अतिशय पॉश भागांमध्ये महागडे फ्लॅट्स भेट म्हणून दिल्याचं EDला आढळून आलंय.

आई आमदार व्हावी म्हणून मुलाने घेतली रिंगणातून माघार!

राज्यातल्या विविध शहरांमध्ये ही घरं असल्याची शक्यताही व्यक्त केली जातेय. EDकडे या नेत्यांची नावं असून त्याबाबत अतिशय गुप्तता बाळगण्यात येत आहेत. ही नावं बाहेर आलीत तर  महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप घडू शकतो अशी शक्यता व्यक्त करण्यात येतेय. महाराष्ट्रात सध्या निवडणुका सुरू आहेत त्यामुळे ED अतिशय काळजीपूर्वक या प्रकरणाचा तपास करत असून अतिशय गुप्तता पाळण्यात येत असल्याचं सूत्रांनी सांगितलंय.

'युती'ला धडा शिकविण्यासाठी 'मनसे' राष्ट्रवादीची छुपी खेळी!

या छाप्यामध्ये EDला अलिबागमध्ये एक 22 खोल्यांचं अलिशान घरही मिळालं असून तेही जप्त करण्यात येणार आहे अशी माहिती EDच्या अधिकाऱ्यांनी दिली. HDIL च्या संचालकांच्या नावावर एक विमानही आढळून आलंय. या संचालकांची मालदीवमध्ये संपत्ती असून काही यॉट्स असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे ED मालदीवमधल्या अधिकाऱ्यांशीही संपर्कात असल्याची माहितीही EDने दिलीय.

शनिवारी वाधवान यांचं खासगी विमान आणि दागिने असा 60 कोटींचा ऐवज जप्त करण्यात आलाय. ED ने HDILशी संबंधीत संचालकांच्या मुंबईतल्या 6 ठिकाणांवर छापे घातले असून अनेक तास ही शोध मोहिम सुरू होती.

First published: October 7, 2019, 5:51 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading