VIDEO: PM मोदींचं वक्तव्य भिडे गुरूजींनी ठरवलं चुकीचं, पुन्हा नवा वाद?

VIDEO: PM मोदींचं वक्तव्य भिडे गुरूजींनी ठरवलं चुकीचं, पुन्हा नवा वाद?

संभाजी भिडे गुरुजींच्या आक्षेपामुळे पुन्हा एकदा वादाला तोंड फुटण्याची शक्यता.

  • Share this:

सांगली, 29 सप्टेंबर: संयुक्त राष्ट्राच्या सभेमध्ये 74 व्या अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलताना भारताने जगाला युद्ध नाही तर बुद्ध दिला असं पाकिस्तानला सुनावलं होतं. त्याच्या या वक्तव्यावर संभाजी भिडे यांनी आक्षेप घेतला आहे. यामुळे आता पुन्हा वादाला तोंड फुटलं आहे.

दौडमध्ये बोलताना भिडे गुरुजी म्हणाले, 'भारताने जगाला बुद्ध दिला हे अजिबात बोलायचं नाही. पंतप्रधान हे चुकीचे बोलले होते. निती-धर्म संभाजी महाराज आणि शिवाजी महाराजांनी दिलं आहे.' त्यांच्या या आक्षेपामुळे पुन्हा एकदा संभाजी भिडे गुरूजी चर्चेत येणार का हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

याधी संभाजी भिडे गुरुजींनी वादग्रस्त विधानं केली आहेत. 'आंबा खाल्याने पुत्रप्राप्ती होतेच हे कोर्टात सिद्ध करेन. विशिष्ट आंबा खाल्ल्याने पुत्रप्राप्ती होते. या आंब्यावर ऑस्ट्रेलियात संशोधन झालं आहे. त्यात या आंब्यात ती शक्ती असल्याचं सिद्ध झालं आहे. भारतातही अनेकांनी सशोधन केलं असून त्यातही ती गोष्ट सिद्ध झाली आहे. त्यामुळे हे योग्य पद्धतीने समजून घेतलं पाहिजे,' असं म्हणत संभाजी भिडे यांनी मोठा वाद ओढवून घेतला होता. या वक्तव्यानंतर भिडेंवर राज्यभरातून चौफेर टीका झाली होती.

'मनुस्मृतीचा अभ्यास करून आंबेडकरांनी राज्यघटना लिहिली. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी मनूचं कौतुक केलं होतं हा इतिहास आहे आणि राज्यघटनाही आंबेडकरांनी मनुस्मृती वाचून लिहिली,' असा भिडेंनी केला होता. त्यानंतर अनेक अभ्यासकांनी हा दावा खोडून काढल्याने भिडेंची हे वक्तव्य निराधार असल्याचं सिद्ध झालं होतं.

'ज्ञानेश्वर आणि तुकारामांपेक्षा मनू श्रेष्ठ. गावपातळीपासून संघटनात्मक बांधणी करून हजारो अनुयायांना आपल्या मार्गावर चालायला शिकवणारा मनू हा संत ज्ञानेश्वर आणि संत तुकारामांपेक्षाही श्रेष्ठ होता', असं धक्कादायक विधान संभाजी भिडे यांनी केलं. त्यानंतर भिडे यांना राज्यभरातील लोकांच्या रोषाचा सामना करावा लागला होता.

Published by: Kranti Kanetkar
First published: September 29, 2019, 11:38 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading