दीक्षाभूमीवर पंतप्रधानांचं महामानवाला अभिवादन

दीक्षाभूमीवर पंतप्रधानांचं महामानवाला अभिवादन

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नागपूरमधल्या दीक्षाभूमीवर जाऊन महामानवाला अभिवादन केलं आहे.

  • Share this:

14 एप्रिल :  भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची आज 126वी जयंती. या निमित्ताने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नागपूरमधल्या दीक्षाभूमीवर जाऊन महामानवाला अभिवादन केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. त्याचप्रमाणे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, एचआरडी मिनिस्टर प्रकाश जावडेकर देखील उपस्थित होते.

या निमित्त महाराष्ट्रासह देभरात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. महामानवाला अभिवादन करण्यासाठी ठिकठिकाणी जय्यत तयारी करण्यात आली आहे. नागपूरच्या दीक्षाभूमीवरही बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त तयारी पूर्ण झाली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना नमन करण्यासाठी नागरिकांची पावलं नागपूरच्या दिशेनं निघाली आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नागपूर दौऱ्यानिमित्त कडेकोट सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त मोदी दीक्षाभूमीलाही भेट दिली. दीक्षाभूमीवर अर्धा तास थांबल्यानंतर मोदी कोराडी, चंद्रपूर आणि परळीतल्या नव्या वीज संचाचं लोकार्पण केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही ट्वीट करुन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना दिली आहे.

First published: April 14, 2017, 10:11 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading