पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पंकजा मुंडे आणि मुख्यमंत्र्यांचं केलं कौतुक, म्हणाले...

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पंकजा मुंडे आणि मुख्यमंत्र्यांचं केलं कौतुक, म्हणाले...

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. मुंबईमध्ये विकासकामांचं उद्घाटन केल्यानंतर ते औरंगाबादला पोहोचले. औरंगाबादमध्ये त्यांनी भाषणाची सुरुवात मराठीतून गौरीगणपतीच्या शुभेच्छा देऊन केली.

  • Share this:

औरंगाबाद, 7 सप्टेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. मुंबईमध्ये विकासकामांचं उद्घाटन केल्यानंतर ते औरंगाबादला पोहोचले. औरंगाबादमध्ये त्यांनी भाषणाची सुरुवात मराठीतून गौरीगणपतीच्या शुभेच्छा देऊन केली. याच भाषणात मोदींनी महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडेंचं कौतुक केलं. बचतगटांच्या माध्यमातून महिलांचा विकास साधल्याबद्दल त्यांनी पंकजा मुंडेंचा विशेष उल्लेख केला.

त्याआधी, पंकजा मुंडेंनी राज्यभरातल्या बचत गटांच्या कामांचा आढावा घेतला. बचत गटांचा मोठा विस्तार झाला असून आता 4 लाख 5 हजार बचत गट झाले आहेत. या बचत गटांची उत्पादनं परदेशातही जातात. या निमित्ताने राज्यातल्या महिलांनाही परदेशात जाण्याची संधी मिळाली, असं त्या म्हणाल्या. महिलांच्या कौशल्य विकासावर भर दिल्यामुळे त्या स्वयंपूर्ण झाल्या हेही त्यांनी आवर्जून सांगितलं.

पंतप्रधानांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचंही कौतुक केलं. देवेंद्र फडणवीस हे यशस्वी मुख्यमंत्री आहेत, असं ते म्हणाले.

पंतप्रधान मोदींसमोरच उद्धव ठाकरेंनी 'युती'वर केलं शिक्कामोर्तब

पंतप्रधानांच्या हस्ते शनिवारी (7 सप्टेंबर) वांद्रे-कुर्ला संकुलात तीन मेट्रो मार्ग आणि मेट्रो भवनाचं भूमिपूजन करण्यात आलं. या तीन मार्गांमुळे शहरातील मेट्रोचं जाळं 42 किलोमीटरनं वाढणार आहे. यामध्ये गायमुख ते शिवाजी चौक हा मेट्रो 10 वरील 9.2 किलोमीटर मार्ग, मेट्रो 11 वरील वडाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि मेट्रो 12 वरील कल्याण ते तळोजापर्यंत 20.7 किलोमीटरचा मार्ग समाविष्ट आहे. तसंच कांदिवलीतील बाणडोंगरी मेट्रो स्थानक आणि मेक इन इंडिया अंतर्गत तयार करण्यात आलेल्या मेट्रो कोचचंही उद्घाटन त्यांनी केलं.

========================================================================================================

VIDEO: मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदी गणरायाचरणी लीन

First Published: Sep 7, 2019 04:57 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading