Home /News /maharashtra /

'बाळासाहेब ठाकरे लाखो लोकांना प्रेरणा देत राहतील', जयंतीनिमित्त PM मोदींकडून अभिवादन

'बाळासाहेब ठाकरे लाखो लोकांना प्रेरणा देत राहतील', जयंतीनिमित्त PM मोदींकडून अभिवादन

Tokyo: Indian Prime Minister Narendra Modi speaks during a joint news conference with Japanese Prime Minister Shinzo Abe at Abe's official residence in Tokyo Monday, Oct. 29, 2018. AP/PTI(AP10_29_2018_000189B)

Tokyo: Indian Prime Minister Narendra Modi speaks during a joint news conference with Japanese Prime Minister Shinzo Abe at Abe's official residence in Tokyo Monday, Oct. 29, 2018. AP/PTI(AP10_29_2018_000189B)

देशभरातील दिग्गज नेत्यांकडूनही बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यात येत आहे.

    मुंबई, 23 जानेवारी : शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची आज 94 वी जयंती आहे. यानिमित्त शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे यांचं स्मृतीस्थळ फुलांनी सजवण्यात आलं आहे. त्यांना अभिवादन करण्यासाठी शिवसैनिक शिवाजी पार्ककडे ओढ घेत आहेत. तसंच देशभरातील दिग्गज नेत्यांकडूनही बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यात येत आहे. जयंतीनिमित्त बाळासाहेब ठाकरे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिवादन केलं आहे. 'महान बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीनिमित्त अभिवादन. धैर्यवान बाळासाहेबांनी लोकांच्या प्रश्नांना आवाज देताना कधीही मागे-पुढे पाहिले नाही. भारतीय मुल्यांबद्दल त्यांना नेहमीच अभिमान होता. ते लाखो लोकांना प्रेरणा देत राहतील,' अशा शब्दांत नरेंद्र मोदी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. दुसरीकडे, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल आदर व्यक्त केला आहे. दरम्यान, बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेनेकडून शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे. 'शिवसेना वचनपूर्ती जल्लोष' सोहळ्यात मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा जाहीर सत्कार होणार आहे. हा सत्कार सोहळा वांद्रे-कुर्ला संकुलातील एमएमआरडीए मैदानात होणार आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या वर्षी शिवसेनेची स्थापना केली होती, त्यावेळच्या शिवसेनेच्या पहिल्या फळीतील जेष्ठ शिवसैनिकांचा या सत्कार सोहळ्यात गौरव होणार आहे.
    Published by:Akshay Shitole
    First published:

    Tags: Balasaheb thackeray, Narendra modi

    पुढील बातम्या