मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'फडणवीस राजीनामा देतील का?' पंतप्रधानांच्या घराणेशाहीवरच्या टीकेवर राष्ट्रवादीचा निशाणा

'फडणवीस राजीनामा देतील का?' पंतप्रधानांच्या घराणेशाहीवरच्या टीकेवर राष्ट्रवादीचा निशाणा

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात घराणेशाहीवर टीका केली. यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादीच्या (NCP) नेत्याने देवेंद्र फडणवीसांवर (Devendra Fadnavis) निशाणा साधला आहे.

  • Published by:  Shreyas
मुंबई, 15 ऑगस्ट : भ्रष्टाचार आणि घराणेशाही हे देशाला लागलेली कीड आहे. जिथे देशभरात गरीब लोक जगण्यासाठी लढत आहे, तिथे आपल्याला भ्रष्टाचाराविरोधात पूर्ण ताकदीने लढावे लागणार आहे' असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी लालकिल्ल्यावरून काँग्रेसवर निशाणा साधला. स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केल्यानंतर राष्ट्राला उद्देशून भाषण केलं, पंतप्रधानांच्या घराणेशाहीवरच्या टीकेवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील (Rupali Patil) यांनी निशाणा साधला आहे. रुपाली पाटील यांनी ट्वीट करत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा उल्लेख केला आहे. घराणेशाही संपवणार - मा.नरेंद्रजी मोदी साहेब गंगाधरराव फडवणीस - मा.आमदार शोभाताई फडवणीस - माजी मंत्री देवेंद्र फडवणीस - उपमुख्यमंत्री वाट पाहूया ? मोदी साहेबानी महाराष्ट्रातून व त्यांच्या पक्षातून सुरवात करण्याची . देशाच्या लोकप्रिय पंतप्रधानांच्या शब्दाचा मान राखत घराणेशाहीचा वारसा लाभलेले देवेंद्र फडवणीस राजीनामा देतील का? असा प्रश्न रुपाली पाटील यांनी विचारला आहे. अजित पवारांची प्रतिक्रिया दरम्यान पंतप्रधानांच्या घराणेशाहीवरच्या टीकेवर अजित पवार यांनीही भाष्य केलं आहे. अजित पवार म्हणाले, की ज्यांच्यामध्ये कुवत आहे अशा लोकांना सत्तेवर बसवत असाल तर याला घराणेशाही बोलणं चुकीचं आहे. कुवत नसलेली लोक सत्तेत बसत असतील, तर आपण त्याला घराणेशाही बोलू शकतो.
First published:

Tags: Devendra Fadnavis, Narendra modi

पुढील बातम्या