मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /मोठी बातमी ! पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे उद्या एकाच मंचावर येण्याची शक्यता

मोठी बातमी ! पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे उद्या एकाच मंचावर येण्याची शक्यता

Lata Deenanath mangeshkar award: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मास्टर दीनानाथ मंगेशकर प्रतिष्ठानचा पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार घोषित झाला आहे.

Lata Deenanath mangeshkar award: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मास्टर दीनानाथ मंगेशकर प्रतिष्ठानचा पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार घोषित झाला आहे.

Lata Deenanath mangeshkar award: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मास्टर दीनानाथ मंगेशकर प्रतिष्ठानचा पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार घोषित झाला आहे.

मुंबई, 23 एप्रिल : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi), राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) हे उद्या एकाच मंचावर एकत्र येणार असल्याची माहिती समोर येत आहे. मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानचा पहिला लता मंगेशकर पुरस्कार देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर झाला आहे हा पुरस्कार सोहळा उद्या म्हणजेच 24 एप्रिल रोजी मुंबईत पार पडणार आहे. या कार्यक्रमासाठी हे तिन्ही नेते एकाच व्यासपीठावर एकत्र येण्याची शक्यता आहे.

राज्यात शिवसेना विरुद्ध भाजप यांच्यात सुरू असलेलं कोल्ड वॉर, तसेच हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन वारंवार भाजपकडून शिवसेनेला विचारण्यात येणारे प्रश्न आणि त्यातच मनसेने हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतल्याने भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी मिळून शिवसेनेला कोंडीत पकडलं आहे. त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे एकाच मंचावर येणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे विविध चर्चा रंगण्यास सुरुवात झाली आहे.

वाचा : मोठी बातमी ! नवनीत राणा आणि रवी राणा यांनी Facebook Live करत केली 'ही' घोषणा

मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानचा पहिला लता मंगेशकर पुरस्कार देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर झाला आहे. दीनानाथ मंगेशकर प्रतिष्ठान, पुणे, हा एक नोंदणीकृत सार्वजनिक चॅरिटेबल ट्रस्ट असून मंगेशकर कुटुंबीयांनी 32 वर्षांपूर्वी स्थापन केला आहे. प्रतिष्ठानतर्फे संगीत, नाटक, कला, वैद्यकीय व्यावसायिक आणि सामाजिक कार्य क्षेत्रातील दिग्गजांचा सत्कार केला जातो. यंदाचा पुरस्कार वितरण सोहळा रविवार 24 एप्रिल 2022 रोजी मुंबईतील श्री षण्मुखानंद हॉल, येथे आयोजित करण्यात आला आहे. दीनानाथ मंगेशकर यांचा 24 एप्रिल हा स्मृतीदिन असून त्यानिमित्ताने या पुरस्कारांचे आयोजन करण्यात आले आहे.

या वर्षी 6 फेब्रुवारी रोजी भारतरत्न लता दीदींच्या निधनाने आमच्या कुटुंबावर सर्वात मोठा दुःखद प्रसंग कोसळला. कुटुंब आणि ट्रस्ट (कुटुंबातील सर्व सदस्य प्रतिष्ठानचे विश्वस्त आहेत). प्रतिष्ठानने भारतरत्न लता दीदींच्या स्मरणार्थ आणि स्मृतीप्रित्यर्थ यावर्षीपासून पुरस्कार देण्याचे ठरवले आहे. हा पुरस्कार "लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार" म्हणून ओळखला जाईल, आणि दरवर्षी दीनानाथजींच्या स्मृतीदिनी म्हणजे 24 एप्रिल रोजी प्रदान केला जाणार आहे.

वाचा : राज्यात राष्ट्रपती राजवट? भाजप नेते आशिष शेलारांनी केलं 'हे' विधान

यंदा मास्टर दीनानाथजींचा 80 वा स्मृती दिन आहे. त्यानिमित्त "लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार" ची घोषणा करण्यात आली. हा पुरस्कार दरवर्षी देशासाठी, लोकांसाठी आणि समाजासाठी अतुलनीय, नेत्रदीपक आणि अनुकरणीय योगदान देणाऱ्या फक्त एकाच व्यक्तीला दिला जाईल. हा पहिला पुरस्कार भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर करण्यात आला आहे. उषा मंगेशकर या समारंभाच्या अध्यक्षस्थानी असतील आणि त्यांच्या हस्ते पुरस्कार विजेत्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात येईल.

पुरस्कार प्राप्त नामवंतांची यादी खालीलप्रमाणे आहे.

1 लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार- माननीय नरेंद्र मोदी (विशेष वैयक्तिक पुरस्कार)

2 मास्टर दीनानाथ पुरस्कार- राहुल देशपांडे (भारतीय संगीत)

3 मास्टर दीनानाथ पुरस्कार- (विशेष पुरस्कार) आशा पारेख (चित्रपट क्षेत्रात समर्पित सेवा)

4 मास्टर दीनानाथ पुरस्कार- (विषेश पुरस्कार) जॅकी श्रॉफ (चित्रपट क्षेत्रात समर्पित सेवा)

5 मास्टर दीनानाथ पुरस्कार- (आनंदमयी पुरस्कार) मुंबईचे डबेवाले (नूतन मुंबई टिफिन बॉक्स सप्लायर्स चॅरिटी ट्रस्ट) समाजसेवेच्या क्षेत्रात समर्पित सेवा.

6 सर्वोत्कृष्ट नाटक पुरस्कार- संज्या छाया

यंदाचा पुरस्कार सोहळा संध्याकाळी 6 ते 6.15 दरम्यान सुरु होईल. 7.45 ते 8 मध्यंतर असेल. रात्री 8 वाजता "स्वरलतांजली" या संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे. सुप्रसिद्ध गायक रूपकुमार राठोड यांच्याद्वारे हा कार्यक्रम आयोजित केले जाणार आहे. या कार्यक्रमात आपल्या लाडक्या माननीय लता दीदींच्या अमर सुरांना आणि आठवणींना श्रद्धांजली अर्पण करण्यात येईल. रूप कुमार राठोड,  हरिहरन, आर्या आंबेकर, रीवा राठोड, प्रियांका बर्वे, मधुरा दातार आणि विभावरी आपटे या आपल्या मधुर संगीतांनी लतादीदींची गाणी सादर करणार आहेत. हा संगीत कार्यक्रम हृदयेश आर्ट्स, 80 वी मास्टर दीनानाथ मंगेशकर पुण्यतिथी आणि मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे.

First published:

Tags: Maharashtra News, Narendra modi, Uddhav thackeray