पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उद्धव ठाकरेंना फोन, कोरोनासंदर्भात केली चर्चा

New Delhi: Prime Minister Narendra Modi at the silver jubilee celebration of National Human Right Commission, in New Delhi, Friday, Oct 12, 2018. (PTI Photo/Atul Yadav) (PTI10_12_2018_100098B)

सध्या महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजे 32 कोरोना बाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे

  • Share this:
    नवी दिल्ली, 15 मार्च : देशभरात कोरोना व्हायरसची (Coronvirus) भीती वाढत आहे. सध्या महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजे 32 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhav Thackray) य़ांच्याशी फोनद्वारे संपर्क साधला. एएनआयने ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कोरोनाचा प्रभाव वाढू नये यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याचं आवाहन केलं आहे.

    Sources: PM Narendra Modi had telephonic conversation with Maharashtra CM Uddhav Thackeray. They discussed the situation of #Coronavirus in the state and the measures regarding it. (file pics) pic.twitter.com/UjTVv38DBC

    — ANI (@ANI) March 15, 2020 राज्यातल्या कोरोनाग्रस्तांची (covid-19) संख्या वाढली आहे. आता देशात सर्वाधिक coronavirus चे रुग्ण महाराष्ट्रात आहेत. मुंबई, नवी मुंबई आणि यवतमाळमध्येसोबतच आता औरंगाबादमध्येही रुग्ण सापडल्याने राज्यातल्या बाधितांची संख्या वाढली आहे.  महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या 32 वर पोहोचली आहे. कोरोना संदर्भात खबरदारीचा पर्याय म्हणून सगळ्या शाळा बंद करण्यात आल्या आहेत. यात राज्यातल्या सरकारी आणि खासगी सर्व शाळांचा समावेश आहे. येत्या 31 मार्चपर्यंत राज्यातील सर्व शाळा बंद राहतील, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी विधानसभेत सांगितलं. कुठल्या शहरात किती रुग्ण? पुणे - 10 नागपूर - 4 यवतमाळ - 2 ठाणे - 1 अहमदनगर - 1 कल्याण 1 पनवेल - 1 नवी मुंबई - 1 मुंबई - 5 औरंगाबाद - 1 दरम्यान, बुलडाणा जिल्ह्यात एका संशयित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याचे स्वॅब रिपोर्ट अद्याप प्रतीक्षेत आहेत.पूर्व आफ्रिकेत सापडलेला पहिला कोरोना रुग्ण मुंबईहून संसर्ग घेऊन गेला आहे.
    First published: