कौतुकाचा वर्षाव करत CM फडणवीसांना पंतप्रधान मोदींकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा

कौतुकाचा वर्षाव करत CM फडणवीसांना पंतप्रधान मोदींकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त ट्वीट करत त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

  • Share this:

मुंबई, 22 जुलै : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज वाढदिवस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त ट्वीट करत त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

'महाराष्ट्राच्या उत्साही आणि गतिशील मुख्यमंत्र्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. गेल्या पाच वर्षांमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राने विकासाचा उच्चांक गाठला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी गरिबांसाठी मोठ्या प्रमाणात काम केलं आहे.' असं म्हणत नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्र्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

दरम्यान, महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाही आज वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त अजित पवार यांना बहिण खासदार सुप्रिया सुळे यांनी खास शब्दांमध्ये शुभेच्या दिल्या आहेत.

'प्रिय अजित दादा, तुमचा आज वाढदिवस! तुम्ही आम्हा सर्वांसाठी उर्जेचा अखंड स्रोत आहात. वाढदिवसाच्या निमित्ताने तुम्हाला निरोगी असे दिर्घायुष्य लाभो हीच शुभेच्छा,' अशा शब्दांत सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांना शुभेच्छा दिल्या आहेत.

<iframe src="https://www.facebook.com/plugins/post.php?href=https%3A%2F%2Fwww.facebook.com%2Fsupriyasule%2Fposts%2F2522494297782552&width=500" width="500" height="688" style="border:none;overflow:hidden" scrolling="no" frameborder="0" allowTransparency="true" allow="encrypted-media"></iframe>

SPECIAL REPORT : मीच पुन्हा परत येतोय, मुख्यमंत्र्यांचा शिवसेनेला थेट इशारा

Published by: Akshay Shitole
First published: July 22, 2019, 9:44 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading