मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Corona रोखण्यासाठी अहमदनगर जिल्ह्याने उचललेल्या पावलांची पंतप्रधानांनी घेतली दखल

Corona रोखण्यासाठी अहमदनगर जिल्ह्याने उचललेल्या पावलांची पंतप्रधानांनी घेतली दखल

PM Narendra Modi interacts with district officials: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 10 राज्यांतील जिल्हाधिकाऱ्यांसोबत संवाद साधत कोरोना स्थितीचा आढावा घेतला.

PM Narendra Modi interacts with district officials: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 10 राज्यांतील जिल्हाधिकाऱ्यांसोबत संवाद साधत कोरोना स्थितीचा आढावा घेतला.

PM Narendra Modi interacts with district officials: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 10 राज्यांतील जिल्हाधिकाऱ्यांसोबत संवाद साधत कोरोना स्थितीचा आढावा घेतला.

अहमदनगर, 20 मे: देशभरातील अनेक राज्यांत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने (Coronavirus 2nd wave) थैमान घातल्याचं पहायला मिळालं. आता कुठे बाधितांच्या संख्येत घसरण होत आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी 10 राज्यांचे मुख्यमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी कोविड प्रतिबंधक उपाययोजनांसाठी (steps to prevent coronavirus) अहमदनगर जिल्ह्याने (Ahmednagar District) उचललेल्या पावलांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दखल घेतली.

अहमदनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले (Collector Rajendra Bhosale) यांनी जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या उपाययोजना, केंद्र आणि राज्य शासनाच्या आदेशाची यशस्वी अंमलबजावणी, माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेची व्यापक अंमलबजावणी आदींची माहिती पंतप्रधानांना दिली. या उपाययोजनांच्या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाधान व्यक्त केले आहे.

वाचा: 'हा आमचा अपमान' म्हणत मोदींच्या बैठकीवर ममता बॅनर्जी भडकल्या; उपस्थित 10 CM बोलले फक्त PM

नगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी काय काय उपाययोजना केल्या याची सविस्तर माहिती पंतप्रधानांना दिली. या उपाययोजनांमुळे जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढण्यापासून रोखण्यात यश आले आणि त्यामुळेच पंतप्रधानांनी सुद्धा यावर समाधान व्यक्त केलं आहे.

कोविड-19 परिस्थितीबाबत राज्य आणि जिल्हाधिकाऱ्यांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि राज्यातील काही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी सहभागी झाले होते. या सर्वांनी आपआपल्या जिल्ह्यांत कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी तसेच जनजागृती करण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती यावेळी दिली.

महारोगराई विरुद्ध लढा देताना राज्य आणि जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामांची पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रशंसा केली. तसेच त्यांनी पुढे म्हटलं, सर्व स्तरावर राज्ये आणि विविध हितधारकांच्या सूचनांचा समावेश करून लसीकरण धोरणही पुढे राबवले जात आहे. नागरिकांचे प्राण वाचवत असताना त्यांचे जीवनमान सुलभ करण्याला प्राधान्य असायला हवे यावर त्यांनी भर दिला. गरीबांना मोफत धान्य पुरवठा तसेच इतर आवश्यक वस्तूंचा पुरवठा झाला पाहिजे असंही पंतप्रधानांनी म्हटलं.

First published:

Tags: Ahmednagar, Coronavirus, Narendra modi