मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

गणपतीच्या सजावटीत 'इकोफ्रेंडली' साहित्य वापरा - पंतप्रधानांचं मंडळांना आवाहन

गणपतीच्या सजावटीत 'इकोफ्रेंडली' साहित्य वापरा - पंतप्रधानांचं मंडळांना आवाहन

सार्वजनिक मंडळांनी आणि घरगुती आरास करताना सर्व साहित्य इकोफ्रेंडली वापरावं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना केलं आहे.

सार्वजनिक मंडळांनी आणि घरगुती आरास करताना सर्व साहित्य इकोफ्रेंडली वापरावं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना केलं आहे.

सार्वजनिक मंडळांनी आणि घरगुती आरास करताना सर्व साहित्य इकोफ्रेंडली वापरावं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना केलं आहे.

नवी दिल्ली,ता.29 जुलै : महिनाभरानंतर येणाऱ्या गणेशोत्सवात सार्वजनिक मंडळांनी आणि घरगुती आरास करताना सर्व साहित्य इकोफ्रेंडली वापरावं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना केलं आहे. आज झालेल्या मन की बात मध्ये पंतप्रधांनी हे आवाहन केलं. महाराष्ट्रात गणेशोत्सव अतिशय उत्साहात आणि आनंदात साजरा करतात. महाराष्ट्राचा हा सर्वात मोठा सार्वजनिक उत्सव आहे. गणेश मंडळांची संख्याचीही प्रचंड आहे. घरोघरी गणेशाची स्थापना केली जाते आणि त्यासाठी सुंदर सजावटही केली जाते. त्यासाठी मोठ्या प्रमाणात प्लास्टिक, धर्मोकॉल आणि इतर विघटन न होणाऱ्या वस्तुंचा वापर केला जात असतो. त्यामुळे प्रचंड प्रदुषण होतं. हे प्रदुषण टाळण्यासाठी सर्वानी नैसर्गिक रंग आणि पर्यावरणपूरक साहित्याचा वापर केल्यास पर्यावरणाचं संवर्धन होईल आणि आपला आनंदही व्दिगुणीत होईल असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. लोकमान्य टिळकांनी गणोशोत्सवाची सुरूवात करून देशवासियांमध्ये जागृतीचं काम केलं याचा उल्लेखही पंतप्रधानी केला.

एकदा तरी 'आषाढी वारी' अनुभवावी : पंतप्रधानांचं 'मन की बात' मध्ये आवाहन

'मराठा क्रांती मोर्चाचे कुठलेही समन्वयक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला जाणार नाहीत'

'इकोफ्रेंडली' सजावटीसाठी स्पर्धांचं आयोजन केलं जावं आणि त्यांना बक्षिसं दिली जावीत असंही ते म्हणाले. यामुळे लोकांमध्ये जागृती निर्माण होईल आणि निसर्गाचं संरक्षण होईल असं मतही त्यांनी व्यक्त केलं. काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्रात प्लॅस्टिक आणि थर्मोकॉलवर बंदी घालण्यात आली होती. गणेशोत्सवाच्या काळात थर्मोकॉलच्या सजावटीवरही बंदी घालण्यात आली होती. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांच्या या आवाहनाला महत्वप्राप्त झालंय.

पंतप्रधानांनी दिली आषाढी वारीची माहिती

पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या मन की बात मध्ये प्रत्येक वेळी नागरिकांनी पाठवलेल्या सूचनांचा, माहितीचा आवर्जुन उल्लेख करत असतात. आजच्या मन की बात मध्ये पंतप्रधानांनी महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख असलेल्या आषाढी वारीचा उल्लेख केला आणि देशवासियांना माहिती दिली. कोल्हापूरच्या संतोष काकडे यांनी फोन करून पंतप्रधानांना वारीची माहिती देण्याची विनंती केली होती. तोच धागा घेऊन पंतप्रधानांनी वारीची महती देशवासियांना दिली. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आणि इतर संतांनी सामाजिक एकतेच्या धाग्यात सर्वांना गुंफलं, अंधश्रध्देवर प्रहार केले.

एका महिन्यात मागास आयोगाचा अहवाल येईल- देवेंद्र फडणवीस

PHOTOS : अपघातापूर्वीचे अखेरचे 'ते' बसमधील फोटो

माणसां माणसांमधलं देवत्व जागृत केलं. वारीत लाखो वारकरी पवित्र तिर्थक्षेत्रं असलेल्या पंढरपूरमध्ये जातात. गेल्या शेकडो वर्षांपासून ही परंपरा सुरू आहे. विठ्ठलाचं नाव घेत, नाचत, गात, आनंदाने हे लोक 20 ते 20 दिवस चालत पंढपूरला भगवान विठ्ठलाच्या दर्शनासाठी जातात आणि वर्षभराची ऊर्जा घेतात. 'वारी'चा हा सोहोळा अतिशय अद्भूत असतो. तो प्रत्येकाने अनुभवला पाहिजे असं आवाहन पंतप्रधानांनी मन की बात मधून देशवासियांना केलं.

First published:

Tags: 'मन की बात', Aashadhi wari, Ecofirendly ganeshostave, Ganpati, Mann ki baat, Narendra modi, Pandharpur, Vitthal, आषाढी वारी, नरेंद्र मोदी, पंढरपूर, विठ्ठल