'मन की बात'मध्ये चंद्रपूरच्या किल्ला स्वच्छता मोहिमेचं कौतुक

'मन की बात'मध्ये चंद्रपूरच्या किल्ला स्वच्छता मोहिमेचं कौतुक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच्या 'मन की बात'मध्ये चंद्रपूरच्या किल्ला स्वच्छता मोहिमेचं कौतुक केलं. चंद्रपूरच्या 'इकॉलॉजिकल प्रोटेक्शन ऑर्गनायझेशन' या संघटनेनं 200 दिवस मोहिम राबवून किल्ल्याची स्वच्छता केली, हा अतिशय चांगला उपक्रम असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलंय.

  • Share this:

नवी दिल्ली, 29 ऑक्टोबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच्या 'मन की बात'मध्ये चंद्रपूरच्या किल्ला स्वच्छता मोहिमेचं कौतुक केलं. चंद्रपूरच्या 'इकॉलॉजिकल प्रोटेक्शन ऑर्गनायझेशन' या संघटनेनं 200 दिवस मोहिम राबवून किल्ल्याची स्वच्छता केली, हा अतिशय चांगला उपक्रम असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलंय. हा उपक्रम स्वच्छतेच्या चळवळीत काम करणाऱ्यांना प्रेरणा देणारा आहे, असही ते म्हणाले

पंतप्रधान मोदींनी आज 36 व्या 'मन की बात'मधून देशातील नागरिकांशी संवाद साधला. यामध्ये पंतप्रधानांनी अनेक गोष्टींचा उल्लेख केला. महाराष्ट्रातील चंद्रपुराचा देखील पंतप्रधान मोदींनी खास करुन उल्लेख केला. चंद्रपुरातील इकोलॉजिकल प्रोटेक्शन ऑर्गनाईजेशन या ऐन्जिओचं पंतप्रधानांनी कौतूक केलं.

अस्वच्छता पाहून जर तुम्हाला वाटत असेल की स्वच्छता नाही होऊ शकत तर तुम्ही या संस्थेच्या युवा वर्गाकरुन प्रेरणा घेऊ शकतात असं देखील म्हटलं. पंतप्रधान मोदींनी चंद्रपुरकरांचं अभिनंदन देखील केलं.

First published: October 29, 2017, 1:56 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading