मुंबई,ता.27 जून: प्लास्टिक बंदीवरून अवघ्या पाच दिवसांमध्ये पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी यू टर्न घेतला आहे. दुकानदारांची नाराजी ओढवल्यानं गुरूवारपासून छोट्या दुकानदारांना प्लास्टिक पिशव्या वापरण्याची परवानगी देण्यात येणार असल्याचे संकेत कदम यांनी दिले आहे.
या निर्णयामुळे प्लास्टिक बंदीचा फज्जा उडणार हे आता स्पष्ट झालं आहे. अपुरी तयारी आणि अकार्यक्षमता यामुळं एका चांगल्या निर्णयाचा बोजवारा उडणार हे आता स्पष्ट झालंय.
प्लास्टिक बंदी करताना त्याला पर्याय काय असेल याची सरकारनं पुरेशी तयारी केली नाही.
छोटे दुकानदार, किरकोळ भाजी विक्रेते,दुध विक्रेते, हॉटेल चालक यांनी पर्याय देण्याची मागणी सरकारकडे केली होती. प्लास्टिक पिशव्यांवर बंदी आल्याने या दुकानदारांच्या व्यवसायावर परिणाम झाला होता. त्यामुळं सरकारच्या निर्णयावर चौफेर टीका झाली होती.
नाराजी वाढत असल्याने आणि त्याचं राजकारण होत असल्याने रामदास कदम यांनी हा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे.
पहिल्या दिवशी वसूल झालेला दंड
पहिल्या दिवसाची कारवाई, लाखोंचा दंड वसूल
पुणे- 3 लाख 69 हजार
नाशिक - 3 लाख 60 हजार
पिंपरी-चिंचवड - 3 लाख 40 हजार
सोलापूर - 2 लाख 15 हजार
नागपूर - 1 लाख 55 हजार
कोल्हापूर - 45 हजार
सांगली - 40 हजार
संबधीत बातम्या...