मराठा आंदोलकांनी सोलापुरात दोन बसेस जाळल्या, पंढरपुरातही बस फाेडली

मराठा आंदोलकांनी सोलापुरात दोन बसेस जाळल्या, पंढरपुरातही बस फाेडली

  • Share this:

सोलापूर, 21 जुलै : मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या आंदोलनाला सोलापुर जिल्ह्यात हिंसक वळण लागलयं. शनिवारी मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी सोलापुरात दोन बसेस जाळल्या, तर पंढरपूर-सांगोला मार्गावर एसटी महामंडळाची बस फोडली .

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षणासंदर्भात मराठा समाजाला दिलेल्या आश्वासनाची प्रथम पुर्तता करावी आणि त्यानंतरच पंढरपुरात पाय ठेवावेत अशी भूमिका मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी घेतली आहे. आंदोलकांनी शनिवारी सकाळी सोलापुरातील छत्रपती संभाजी महाराज चौकात चक्काजाम आंदोलन करित सामुहीक मुंडन केलं. आणि दोन एसटी गाड्यांची तोडफोड करून त्या पेटऊन दिल्या. सोलापूर पाठोपाठ पंढरपुरातही दोलनाला हिंसक वळण लागले असून, आंदोलकांनी सायंकाळी पंढरपूर-सांगोला मार्गावर एसटी बस फोडली.

गेले वर्षभर मूक पध्दतीने मोर्चे करणाऱ्या मराठा समाजातील तरुणांनी आता आंदोलनाला हिंसक वळण दिल्याचे पहायला मिळतयं. आंदोलनकर्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही निषेध करीत आहेत. दरम्यान या घटनेनंतर मराठा समाजातील कार्यकर्त्यांना शहर पोलिसांनी ताब्यात घ्यायला सुरुवात केलीय. या घटनेनंतर सकल मराठा समाजाने मुख्यमंत्र्याना दिलेल्या इशाऱ्याकडे पोलीस प्रशासन गांभीर्याने पाहतेय.

...आणि म्हणून ते थेट गळ्यात पडले - मोदी

औरंगाबादेतही ठिय्या आंदोलन

मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकार्ययांनी औरंगाबादेतही ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. शहरातील क्रांती चौकात हे आंदोलन सुरू झाले आहे. मागण्या मान्य होईपर्यंत हे आंदोलन सुरू असणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आषाढीला पूजेला येऊ देणार नाही या भूमिकेवर आंदोलन ठाम आहे. पंढरपुरात बाळाचा वापर झाला तर मराठा समाज त्यासाठी तयार असल्याचे मोर्चा आयोजकांचे म्हणणे आहे.

हेही वाचा...

पुण्यात नाल्याच्या काठावरील घर कोसळले; एक चिमुकली आणि जनावरे ढिगाऱ्याखाली

अंधश्रद्धेच्या नावाखाली १२० महिलांवर बलात्कार करणाऱ्या भोंदूबाबाला अटक

जिममध्ये वेट लिफ्टिंग करताना २२ वर्षीय तरुणाला कार्डियाक्ट अरेस्ट, VIDEO व्हायरल

 

 

First published: July 21, 2018, 8:06 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading