Home /News /maharashtra /

करुणा शर्मा यांच्या गाडीत आढळलं पिस्तूल, बीडमध्ये तणावाचे वातावरण

करुणा शर्मा यांच्या गाडीत आढळलं पिस्तूल, बीडमध्ये तणावाचे वातावरण

Pistol found in Karuna Sharma car: करुणा शर्मा यांच्या गाडीत पिस्तूल आढळून आल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

बीड, 5 सप्टेंबर : गेल्याकाही दिवसांपासून चर्चेत असलेल्या करुणा शर्मा (Karuna Sharma) या आज बीड (Beed)मध्ये दाखल झाल्या आहेत. बीडमधील परळी शहरात करुणा शर्मा दाखल (Karuna Sharma in Parali) झाल्या असून त्यांच्या गाडीत पोलिसांना पिस्तूल आढळून आले आहे. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. हे पिस्तूल त्यांचेच आहे का तसेच याचं त्यांच्याकडे लायसन्स आहे का याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. परळी मध्ये करुणा शर्मा दाखल झाल्यानंतर वैद्यनाथ मंदिरासमोर पायरीचे दर्शन घेण्यासाठी जात असताना जमावाने त्यांना अडवलं. तसेच घेराव घालण्याचा प्रयत्न केला. वैजनाथाच्या दर्शनासाठी करुणा मुंडे पोहोचल्या मात्र या ठिकाणी आमच्या साहेबाला बदनाम करायला आलात का? असा सवाल करत परळीच्या महिलांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. कोरोना प्रतिबंधक निर्बंधांवरुन कलगीतुरा, ठाकरे बंधूंमध्ये रंगले शाब्दिक युद्ध मी फक्त दर्शनासाठी आले असल्याचे सांगत करुणा मुंडे म्हटलं, मला गावात यायला का अडवता? असा प्रश्न उपस्थित करत प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेण्याचा प्रयत्न केला. मात्र परळीच्या महिलांसह अनेक नागरिक आक्रमक झाल्यामुळे रस्त्याने परत जात असताना गाडी अडवली. यामुळे पोलिसांनी त्यांना परळी पोलीस स्टेशनमध्ये बसवून ठेवले आहे. परळी मध्ये तणावपूर्ण वातावरण असून पोलीस वातावरण शांत ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. करुणा शर्मा यांच्या गाडीत पिस्तूल आढळून आल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच स्थानिक ग्रामस्थही जोरदार घोषणाबाजी करत असल्याचं पहायला मिळत आहे. या प्रकरणात आता चौकशी नंतर पोलीस काय भूमिका गेतात हे पहावं लागेल.

तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)

First published:

Tags: Beed

पुढील बातम्या