कोल्हापूरच्या तुरूंगात 'पिस्तुल्या', सुरक्षा वाऱ्यावर?

कोल्हापूरच्या तुरूंगात 'पिस्तुल्या', सुरक्षा वाऱ्यावर?

मोबाईल आला कुठून? ते तथाकथित पिस्तुल घेऊन त्या व्हिडीओ तयार करण्याची त्या कैद्याची हिंम्मत झालीच कशी असे अनेक प्रश्नांची उत्तर कारागृह प्रशासनाला द्यावी लागणार आहेत.

  • Share this:

कोल्हापूर, 28 नोव्हेंबर : कोल्हापूरच्या कळंबा कारागृहामध्ये संतोष पोळ या आरोपीकडे मोबाईल आणि पिस्तूल असल्याचे व्हिडीओ क्लिप व्हायरल झाली होती. त्यानंतर तुरूंग उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांनी कोल्हापूरच्या कारागृहात तात्काळ येऊन चौकशी सुरू केली आणि या चौकशीनंतर व्हिडिओ क्लिप मध्ये असलेलं पिस्तूल बनावट असल्याचे उघड झालंय.

मात्र तुरुंगामध्ये मोबाईल कसा पोहोचला याचा तपास आता जेल प्रशासनाने सुरू केला आहे. पोळ याच्याकडे सापडलेलं पिस्तूल बनावट असून संगीत रजनी कार्यक्रमासाठी कागदी पिस्तूलं तयार करण्यात आल्या होत्या आणि त्यातली एक कागदी पिस्तुल पोळ यानं व्हिडिओमध्ये दाखवल्याचं स्वाती साठे यांनी सांगितलंय.

तर दुसरीकडे मोबाईल पुरवणाऱ्यावर कडक कारवाई केली जाणार असल्याचेही त्या म्हणाल्या. पोळ याला अमोल पवार या कैद्यानं मदत केली असून या सगळ्या प्रकारामध्ये एकूण दहा कैद्यांवर संशय आहे. याप्रकरणाची कसून चौकशी सुरू असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

कोल्हापूरचं कळंबा कारागृह यापूर्वी अनेक गोष्टींसाठी चर्चेत आलं होतं त्यामुळं आता पिस्तुल प्रकरणावर जरी पडदा पडला असला तरी मोबाईल आला कुठून? ते तथाकथित पिस्तुल घेऊन त्या व्हिडीओ तयार करण्याची त्या कैद्याची हिंम्मत झालीच कशी असे अनेक प्रश्नांची उत्तर कारागृह प्रशासनाला द्यावी लागणार आहेत.

First published: November 28, 2018, 11:05 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading