पिंपरीत पोलिसांचा दणका, शिवीगाळ आणि दमदाटी करणाऱ्या दोघांना केली अटक

पिंपरीत पोलिसांचा दणका, शिवीगाळ आणि दमदाटी करणाऱ्या दोघांना केली अटक

दुचाकीवरून आलेल्या दोघांनी पोलिसांना शिवीगाळ करत दमदाटी केल्याची घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडली.

  • Share this:

पिंपरी चिंचवड, 4 नोव्हेंबर : विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर पोलीस कारवाई करत असतात. मात्र हीच कारवाई करताना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी पोलिसांना शिवीगाळ करत दमदाटी केल्याची घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडली. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

या प्रकरणातील मुख्य आरोपी अभिषेक टेकल आणि हरिष गणेश कांबळे या 2 तरुणांविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हे दाखल करून त्यांना सांगवी पोलिसांनी अटक केली आहे. यातील कांबळे यांच्यावर याअगोदर आर्म ऍक्टनुसार गुन्हा दाखल आहे असं पोलिसांनी सांगितलं आहे. 

मंगळवारी रात्री सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंपळे सौदागर येथे पोलीस कर्मचारी कर्तव्य बजावत होते. तेव्हा, दोन्ही आरोपी हे दुचाकीवरून जात होते. त्यांनी मास्क घातले नसल्याने त्यांना पोलिसांनी अडवले. मात्र त्यांनी पोलिसांना सहकार्य न करता थेट पोलिसांना अश्लील शिवीगाळ करत अंगावर धावून जात दमदाटी केली आहे.

हा सर्व प्रकार तेथील एका नागरिकाने मोबाईलमध्ये चित्रित केला आहे. प्रत्येक शब्दाला पोलीस कर्मचाऱ्याला मुख्य आरोपी टेंकल हा शिवीगाळ करत होता. अखेर पोलिसांनी याप्रकरणी दोघाही तरुणांना अटक केली आहे.

दरम्यान, कोरोना काळात आपल्या जीवाची बाजी लावून पोलिसांनी लॉकडाऊनची यशस्वी अंमलबजावणी केली. मात्र अशा पोलिसांसोबतच गैरवर्तन होत असल्याच्या घटना याआधीही समोर आल्या होत्या.

Published by: Akshay Shitole
First published: November 4, 2020, 7:50 PM IST

ताज्या बातम्या