अखेर पिंपरी-चिंचवडची स्मार्ट सिटी योजनेत निवड

अखेर पिंपरी-चिंचवडची स्मार्ट सिटी योजनेत निवड

मागील तीन वर्षा पासून या योजनेत समावेश होण्यासाठी पिंपरी चिंचवड़करांची धडपड सुरू होती.

  • Share this:

23 जून : अखेर केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी स्मार्ट सिटी योजनेंतर्गत पिंपरी-चिंचवड शहाराची आज निवड झाली. मागील तीन वर्षा पासून या योजनेत समावेश होण्यासाठी पिंपरी चिंचवड़करांची धडपड सुरू होती.

या आधीच्या दोन टप्प्यांमध्ये जी शहर निवडली गेली. त्यात शहरांच्या स्पर्धेत आपण सहभागी झालोच नव्हतो असा खळबळजनक खुलासा पिंपरी चिंचवड़चे आयुक्त श्रवण हार्डिकर यांनी केलाय.

पिपरी चिंचवडच्या स्मार्ट सिटी योजनेत समावेश होण्यावरुन मोठे राजकारण पेटल होतं. ह्याच मुद्द्याचं भांडवल करत भाजप सत्तेवरही आली.

मात्र, याआधी भाजप आणि राष्ट्रवादीनं स्मार्ट सिटी योजनेमध्ये शहराचा समावेश का होऊ शकला नाही यासाठी दिलेली कारणं खोटी ठरली आहेत. आता या योजनेअंतर्गत पुढील तीन वर्षात तब्बल आकराशे कोटी रुपये खर्च करून शहराचा नियोजनबद्ध विकास करण्यात येणार असल्याचं आयुक्तांनी स्पष्ट केलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 23, 2017 09:51 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading