सार्वजनिक वाहतुकीचा फज्जा! खुद्द महापौरांनी बस चालवून तपासली सुरक्षा

सार्वजनिक वाहतुकीचा फज्जा! खुद्द महापौरांनी बस चालवून तपासली सुरक्षा

पिंपरी-चिंचवड शहरात सार्वजनिक वाहतुकीचा पूर्णतः बोजवारा उडाला आहे.

  • Share this:

गोविंद वाकडे, प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड, 18 जुलै : पिंपरी-चिंचवड शहरात सार्वजनिक वाहतुकीचा पूर्णतः बोजवारा उडाला आहे. त्यातच आता पिंपरी चिंचवडकरांना मेट्रोबरोबर इलेक्ट्रिक कोचेसच्या माध्यमातून सार्वजनिक वाहतुकीचा नवीन पर्याय उपलब्ध होणार आहे. या कोचेससह महापालिकेच्या रस्त्यावरून धावणाऱ्या इलेक्ट्रॉनिक बसही पिंपरी शहरात दाखल झाल्या आहेत. पुणे ते पिंपरी चिंचवडदरम्यान धावणा-या या नवीन कोऱ्या बस सर्व सुविधा आणि सुरक्षायुक्त आहेतच शिवाय पर्यावरणपुरकही आहेत.

पण तरीही प्रवासादरम्यान नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी स्वतः पिंपरी चिंचवडचे महापौर राहुल जाधव पुढे सरसावले आहेत. महापौर राहुल जाधव यांनी खुद्द बस चालवून सुरक्षिततेची खातरजमा करुन घेतली. अशा पद्धतीने स्वतः पाहणी करणारे जाधव हे पहिलेच महापौर ठरले आहेत.

(पाहा : SPECIAL REPORT : काँग्रेस-राष्ट्रवादीचे कोण-कोणते आमदार लागले भाजपच्या गळाला?)

शहरातल्या इलेक्ट्रॉनिक कोचेसचे मार्ग  

पिंपरी चिंचवड,  नाशिक फाटा, कासारवाडी, पिंपळे गुरव, सौदागर, काळेवाडी, थेरगाव, आकुर्डी, निगडी, तळवडे, चिखली, स्पाईन रोड, चिंचवड एमआयडीसी, भोसरी ते पुन्हा नाशिक फाटा

(पाहा :VIDEO : प्रेयसीच्या घरी रंगेहात सापडला पती, मग काय पत्नीने धु-धु धुतले)

स्मार्ट प्रवास

पिंपरी शहरात होणाऱ्या तब्बल 32 किलोमीटर रिंग रोडवर या बस धावतील. मेट्रोच्या आधी हा प्रकल्प पूर्ण व्हावा, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठीच्या बसेस शहरात दाखल झाल्या आहेत. पण पिंपरी शहरांतर्गत या बस धावण्यासाठी तयार होणाऱ्या इलेक्ट्रॉनिक कोचेसची आता प्रतीक्षा आहे. तोवर या आलिशान बसमधून पुणे आणि पिंपरी चिंचवडकरांना स्मार्ट प्रवास करता येईल.

(पाहा :वेदनेनं त्रस्त तरुणीचा रुग्णालयात हायहोल्टेज ड्रामा, पाहा हा VIDEO)

SPECIAL REPORT : काँग्रेस-राष्ट्रवादीचे कोण-कोणते आमदार लागले भाजपच्या गळाला?

First published: July 18, 2019, 9:07 PM IST

ताज्या बातम्या