निवांतपणे कापत होते चोरटे ATM, पिंपरी चिंचवडमध्ये चाललंय काय? पाहा हा VIDEO

निवांतपणे कापत होते चोरटे ATM, पिंपरी चिंचवडमध्ये चाललंय काय? पाहा हा VIDEO

मागील सहा महिन्यातील झालेल्या ATM फोडीच्या 16 घटनांमध्ये तब्बल 50 लाखांपेक्षा जास्त रोकड लंपास करण्यात आली आहे.

  • Share this:

पिंपरी चिंचवड, 12 फेब्रुवारी : पिंपरी चिंचवड शहरातील चोरट्यांनी अक्षरशः दिसेल ती ATM मशीन कापून नेत त्यातील लाखो रुपयांची रोकड लंपास करणाच्या सपाटा लावला आहे. वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे पिंपरी चिंचवड पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे तर दुसरीकडे पिंपरी चिंचवड करांच्या पैश्याची सुरक्षा रामभरोसे झालीय का असा प्रश्न निर्माण झाला आहे.

निवांतपणे गॅस कटरच्या साह्याने ATM कापत बसलेले हे चोरटे किंवा, गॅस कटरने मशिन कापण्याच्या भानगडीत कोण वेळ घालेल म्हणून चक्क आपल्या कारला ATM मशीन बांधून ती मुळासकट उखडून नेणाऱ्या चोरीची ही दृश्य पाहून तुम्ही म्हणाल की, पिंपरी चिंचवड परिसरातील ATM मशिन्समध्ये भरले जाणारे लाखो रुपयांची रोकड ही काय फक्त चोरट्यांनी चोरून न्यावी म्हणूनच भरली जाते की काय? पण वारंवार होणाऱ्या अशा घटना बघता असा प्रश्न निर्माण होणे सहाजिक आहे. असं असूनही पोलीस मात्र CCTV फुटेज बघून मनोरंजन करण्यातच मश्गुल आहेत.

वाकड परिसरातील थेरगावमध्ये आज फोडल्या गेलेल्या ATM मधून 4 लाखांपेक्षा जास्त रोकड लांबवली गेली. तर अशाच पद्धतीने मागील सहा महिन्यातील झालेल्या ATM फोडीच्या 16 घटनांमध्ये तब्बल 50 लाखांपेक्षा जास्त रोकड लंपास करत चोरटे त्यावर खुलेआम मौज मारत फिरतायत.

पिंपरी शहरात दिवसा ढवळ्या होणारे खून, दरोडे, चोरी, चैन SNATCHING ,बलात्कार, अवैध धंदे, रोखण्यासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाची स्थापना करण्यात आली. मात्र, पोलीस आयुक्तालय स्थापन होऊन दीड वर्ष झाले तरीही पोलिसांचा म्हणावा तसा वचक निर्माण न झाल्यानेच या शहरातील भुरटे चोरही अशा पद्धतीने निवांत चोरी करत पोलिसांना आव्हान देऊ लागले आहेत. आता चोरांनी दिलेल्या या आव्हानाची दखल घेत पिंपरी पोलीस आणि बँका त्यांना चोख उत्तर देतायत की, ATM मशीनसह नागरिकांचा पैसा चोरांच्या हवाली करतात हेच बघावं लागेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 12, 2020 05:56 PM IST

ताज्या बातम्या